घरदेश-विदेशआयएएस अधिकाऱ्याला वृद्धेने दिला आशीर्वाद; जिल्हाधिकाऱ्यांचा साधेपणा पाहून नेटकरी भारावले

आयएएस अधिकाऱ्याला वृद्धेने दिला आशीर्वाद; जिल्हाधिकाऱ्यांचा साधेपणा पाहून नेटकरी भारावले

Subscribe

अलाप्पुझा – आयएएस अधिकाऱ्यांना नेहमीच विविध समस्यातून जावं लागतं. वेळप्रसंगी स्थानिकांशी सामना करावा लागतो. विविध माध्यमातून ते लोकांशी संपर्क साधत असतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका फोटोत आयएएस अधिकाऱ्यांना मनापासून आशीर्वाद देणारी माणसंही असतात हे सिद्ध होत आहे. आयएएस अधिकारी कृष्णा तेजा यांनी एक फोटो ट्विटरला अपलोड केला असून या फोटोमध्ये एक वृद्ध महिला त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद देत आहे.

कृष्णा तेजा हे केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. त्यांनी हा फोटो अपलोड केला आहे. त्यांना भेटण्यासाठी या महिला त्यांच्या कार्यालयात आल्या होत्या. महिलेने त्यांच्या डोक्यावर हात ठेवताच कृष्णा यांनी आदरपूर्वक त्यांच्यासमोर माथा टेकवला.

- Advertisement -

हा फोटो पोस्ट करताना कृष्णा तेजा यांनी कॅप्शनही दिली आहे. यापेक्षा आणखी काय हवंय, असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. त्यांचा हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत असून त्यांच्या पोस्टलाही चांगल्या कॉमेंट्स पडत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -