घरमनोरंजनश्वास घेण्यास त्रास होत असल्याने कोरिओग्राफर सरोज खान रुग्णालयात दाखल

श्वास घेण्यास त्रास होत असल्याने कोरिओग्राफर सरोज खान रुग्णालयात दाखल

Subscribe

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे

बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांना श्वासोच्छवासाच्या अडचणीमुळे मुंबईच्या वांद्रे येथील गुरु नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या ७१ वर्षाच्या आहेत. तीन दिवसांपूर्वी सरोज खान यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. मात्र ती निगेटिव्ह आल्याची माहिती देखील मिळत आहे.

View this post on Instagram

??

A post shared by Saroj Khan (@sarojkhanofficial) on

- Advertisement -

दरम्यान सध्या सरोज खान यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आणखी कोणताही त्रास होत नसल्याने एक-दोन दिवसात दवाखान्यातून डिस्चार्जही मिळेल. काळजी करण्याची काहीच कारण नाही, असे देखील सांगण्यात येत आहे.

सरोज खान या बॉलिवूडच्या उत्कृष्ट नृत्य प्रशिक्षिका आहेत. त्यांनी १९८३ मध्ये हिरो चित्रपटातून नृत्य कोरिओग्राफी करण्यास सुरुवात केली. तसेच हिंदी सिनेमाची अनेक सुपरहिट गाणी कोरिओग्राफ करण्याचे श्रेय सरोज खान यांना जाते. माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी चित्रपटांमधील हिट गाण्यांच्या कोरिओग्राफीसाठीही ते खास ओळखले जातात.

- Advertisement -

अनेक चित्रपटाच्या गाण्यातील कलाकारांना दिले प्रशिक्षण

मिस्टर इंडिया, चांदणी, बेटा, तेजाब, नगीना, डर, बाजीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, परदेश, देवदास, लगान, सोल्जर, ताल, फिजा, साथ‌िया, स्वदेश, कुछ ना कहो, वीर जारा, डॉन, फना, गुरु, नमस्ते लंदन, जब वी मेट, एजेंट विनोद, राउडी राठोड़, एबीसीडी, तनू वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका यासारख्या अनेक चित्रपटातील गाण्यातील कलाकारांना नृत्याचे प्रशिक्षण दिले आहे.


सुशांत माझ्या पोटी जन्माला येणार- ड्रामा क्वीन राखी सावंतचा दावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -