घरदेश-विदेशतांत्रिकांच्या सांगण्यावरून वडील मुलाचा 'आत्मा' पकडण्यासाठी तलवार घेऊन गेले रुग्णालयात

तांत्रिकांच्या सांगण्यावरून वडील मुलाचा ‘आत्मा’ पकडण्यासाठी तलवार घेऊन गेले रुग्णालयात

Subscribe
राजस्थानच्या जोधपूर शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मृत मुलाचा आत्मा आणण्यासाठी वडील हातात तलावर घेऊन रुग्णालयात गेले. रुग्णालयातील महिला वार्डमध्ये तलवार घेऊन तिथे तंत्रमंत्र करायला सुरुवात केली. जोधपूर शहरातील मथुरादास माथूर रुग्णालयात शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतचे वृत्त आज तकने दिले आहे.
मथुरादास माथूर रुग्णालयात दोन लोक हातात तलवार घेऊन रुग्णालयाच्या महिला वार्डमध्ये तंत्रमंत्र करण्याचा प्रयत्न करीत होते. ही माहिती मिळताच रुग्णालयाच्या रक्षकांनी त्यांना पकडले. यावर दोघांनी रुग्णालयात गदारोळ घातला. भोपाजी तांत्रिकाने आम्हाला आत्मा पकडण्यासाठी पाठवले आहे, आम्हाला थांबवू नका, असे त्या दोघांनी सांगितले. रुग्णालय व्यवस्थापनाने त्यांना पकडून शास्त्री नगर पोलिस ठाण्यात सुपूर्द केले. शास्त्री नगर पोलीस स्टेशनने सांगितले की, पाली जिल्ह्यातील जादन येथील रहिवासी भंवरलाल आणि भोपत हे बेकायदा शस्त्रे घेऊन रुग्णालयाच्या आवारात फिरत होते. अशा परिस्थितीत त्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या या दोघांचीही चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दीड वर्षापूर्वी भंवरलाल यांच्या मुलाचा मथुरादास माथूर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. भंवरलाल यांच्या कुटुंबाचा असा वाटतेय की मुलाचा आत्मा त्यांना त्रास देत आहे. अशा परिस्थितीत गावच्या तांत्रिकाने त्यांना सांगितले की जिथे मूलाचा मृत्यू झाला आहे तेथे हवन करा, त्यानंतर सर्व शांत होईल. यामुळे भंवरलाल त्याच्यासह रुग्णालयात तलवार घेऊन गेला होता. अंधश्रद्धेतून हा प्रकार घडला आहे.

हेही वाचा – प्रविण तरडे बाप्पाच्या डेकोरेशनमुळे वादात; संविधानाचा केला अपमान


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -