मानव अर्चनाचे ‘पवित्र रिश्ता २’ मधून कमबॅक, सुशांतच्या जागी दिसणार ‘हा’ अभिनेता

सुशांत या मालिकेत दिसणार नाही नसल्याचे प्रेक्षकांमध्ये खंत

Comeback from Manav Archana on 'Pavitra Rishta 2', actor Shaheer Sheikh will play manav sushant singh rajput character
मानव अर्चनाचे 'पवित्र रिश्ता २' मधून कमबॅक, सुशांतच्या जागी दिसणार 'हा' अभिनेता

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यूला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. सुशांत जाण्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुशांत आज आपल्यात नसला तरी त्याचा चाहता वर्ग आजही कायम आहे. सुशांत देशातील प्रत्येक घराघरा पोहचला तो म्हणजे टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध मालिका ‘पवित्र रिश्ता’मधून (Pavitra Rishta) पवित्र रिश्ता या मालिकेने सुशांत आणि अंकिताला (Ankita Lokhande) खऱ्या अर्थाने ओळख दिली. आजही मालिकेतील मानव आणि अर्चना प्रेक्षकांच्या मनात आहेत. मालिकेच्या कौटुंबिक विषयाने ही मालिका कमी वेळातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अनेक मराठी कलाकार या मालिकेतून दिसले होते. मानव आणि अर्चनाची जोडी त्यावेळी सर्वात लोकप्रिय जोडी म्हणून ओळखण्यात येत होती.आजही मानव आणि अर्चना अनेकांच्या फोनच्या वॉलपेपर सहज दिसतात. लाखो प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी मानव आणि अर्चना पुन्हा एकदा ‘पवित्र रिश्ता २’ (Pavitra Rishta 2) मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मात्र आत सुशांतच्या जागी एक नवीन अभिनेता मानवची भूमिका साकारणार आहे. (Comeback from Manav Archana on ‘Pavitra Rishta 2’)

काही दिवसांपूर्वी मालिकेची निर्माती एकता कपूर हिने ‘पवित्र रिश्ता २’ या मालिकेची घोषणा केली. पवित्र रिश्ता २ ची घोषणा करताच प्रेक्षकांमध्ये जल्लोष पहायला मिळाला. सुशांत या मालिकेत दिसणार नाही याची खंत प्रेक्षकांमध्ये दिसली. मात्र मानवची भूमिका कोण साकारणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष होते. पवित्र रिश्ता २ या मालिकेत अभिनेत्री अंकिता लोखंडे अर्चनाची भूमिका साकारणार आहे तर अभिनेता ‘शाहीर शेख’ (Shaheer Sheikh) मानवची भूमिका साकारणार असल्याचे समजते आहे (Actor Shaheer Sheikh will play manav sushant singh rajput character)  अभिनेता शाहीर शेख याआधी ‘सलिम अनारकली’,’कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या सुपरहिट मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shaheer Sheikh (@shaheernsheikh)


नुकतेच अभिनेत्री अंकिता लोखंडेने पवित्र रिश्ता मालिकेला १२ वर्षे पूर्ण झाल्याचे सेलिब्रेशन करत मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला होता. पवित्र रिश्ता २ या नव्या पर्वाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. पवित्र रिश्ता मालिकेप्रमाणेच पवित्र रिश्ता २ मालिकेला प्रेक्षक किती प्रतिसाद देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – 20 Years Of Lagaan: पहिल्या पत्नीचे ते पत्र वाचून आमिर खान ढसाढसा रडला