जय भानुशालीच्या पत्नीला आणि मुलीला कुकने दिली जीवे मारण्याची धमकी

गुरूवारी जय भानुशाली आणि माही विजने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन कुकविरोधात तक्रार दाखल केली. कुकने जय आणि माहीसोबतच त्यांच्या २ वर्षीय लहान मुलीला देखील जीवेमारण्याची धमकी दिली आहे

हिंदी टेलिव्हिजनवरील अभिनेता जय भानुशाली आणि अभिनेत्री माही विज दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. वारंवार ते आपल्या सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे आणि मुलीबरोबरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. दरम्यान माहीने खुलासा केला आहे की, त्यांच्या घरातील कुकने तिला जेवे मारण्याची धमकी दिली आहे. कुकच्या या धमकीनंतर जय आणि माहीने पोलिस स्टेशनमध्ये कुकविरोधात तक्रार दाखल केला आहे.

माही विजला कुकची धमकी
गुरूवारी जय भानुशाली आणि माही विजने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन कुकविरोधात तक्रार दाखल केली. कुकने जय आणि माहीसोबतच त्यांच्या २ वर्षीय लहान मुलीला देखील जीवेमारण्याची धमकी दिली. माही यासंबंधीत सोशल मीडियावर अनेक ट्वीट देखील केले होते. ज्याला माही नंतर डिलीट देखील केलं. त्यानंतर माहीने एका मुलाखतीत याबाबत संपूर्ण खुलासा केला.

त्या मुलाखतीत माहीने सांगितलं की, फक्त ३ दिवसच झाले होते आणि आम्हाला कळालं की तो कुक घरात चोरी करत आहे. मी जयला याबाबत सांगितलं. जय त्याला त्याच्या ३ दिवसाच्या कामाचे पैस देत होता, मात्र त्याने पूर्ण महिन्याचे पैसे मागितले. जेव्हा जयने त्याला याचं कारण विचारलं तेव्हा, तो कुक म्हणाला- २०० बिहारी आणून ठेवेन. त्याने दारू पिऊन आम्हाला शिवीगाळ करायला सुरूवात केली. त्याने आम्हाला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. त्यामुळे आम्ही पोलिस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. काहीही झालं तरी मला भिती नाही, पण माझ्या मुलीसाठी मी घाबरतेय.

कुकला घेतलं पोलिसांनी ताब्यात
सूत्रांच्या माहितीनुसार, तक्रारी नंकर त्या कुकला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र नंतर त्याला बेल मिळाली. त्यामुळे माही अजूनच काळजीत पडली. माही म्हणाली की. तो तिला सारखे फोन करू लागला. त्यामुळे ती खूप घाबरली आहे.

 


हेही वाचा:ड्रग्ज केसमधून निर्दोष मुक्ततेनंतर आर्यन खानची कोर्टात धाव, दाखल केली याचिका