घरमनोरंजनड्रग्ज केसमधून निर्दोष मुक्ततेनंतर आर्यन खानची कोर्टात धाव, दाखल केली याचिका

ड्रग्ज केसमधून निर्दोष मुक्ततेनंतर आर्यन खानची कोर्टात धाव, दाखल केली याचिका

Subscribe

आर्यन खानच्या याचिकेवर कोर्टाकडून एनसीबीला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणावर सुनावणीसाठी १३ जुलैपर्यंत वेळ देण्यात आला आहे

अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला मागील वर्षी ड्रग्ज ऑन क्रूझ प्रकरणात निर्दोष ठरवलं आहे. एनसीबीकडून आर्यनला क्लीन चिट मिळाली आहे. परंतु गुरुवारी आर्यन खानने विशेष एनडीपीएस कोर्टात एक याचिका दाखल केली आहे. विशेष एनडीपीएस कोर्टात याचिका दाखल करुन आपला पासपोर्ट परत करण्याची मागणी आर्यनने केली आहे. एनडीपीएस कोर्टाकडून जामीन देताना आर्यनला काही अटीं घालण्यात आल्या होत्या तसेच त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला असून आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध आणले होते. परंतु या प्रकरणात निर्देष मुक्त केल्यानंतर अखेर आर्यनने पासपोर्टसाठी याचिका दाखल केली आहे.

आर्यन खानच्या याचिकेवर कोर्टाकडून एनसीबीला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणावर सुनावणीसाठी १३ जुलैपर्यंत वेळ देण्यात आला आहे. आर्यन खानला ऑक्टोबर महिन्यात एका हाय प्रोफाईल ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. आर्यन खानकडे ड्रग्ज सापडल्याचे आरोप माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी केले होते. परंतु मे २०२२ मध्ये एनसीबीकडून दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये आर्यन खानचे नाव ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या आरोपींमध्ये नव्हते. यानंतर ड्रग्ज प्रकरणातून आर्यन खानला निर्दोष मुक्त करण्यात आले.

- Advertisement -

एनसीबीने काही पुराव्यांच्या अभावी आर्यन खान आणि पाच जणांना सोडले. आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला तेव्हा पासपोर्ट जमा करण्यात आला होता. गुरुवारी आर्यन खानने वकिलांच्या मार्फत विशेष न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्यामध्ये आरोप पत्र दाखवत पासपोर्ट परत देण्याची मागणी केली आहे. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानने २० दिवसांपेक्षा जास्त दिवस तुरुंगात काढले आहेत. आर्यन खान प्रकरण महाराष्ट्रात चांगलेच वादग्रस्त ठरले होते. एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांची आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात भूमिका संशयास्पद आढळल्यामुळे त्यांची बदलीसुद्धा करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष एनसीबी टीम गठित करण्यात आली होती.


हेही वाचा :रितेश देशमुखने ट्विट करत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना दिल्या शुभेच्छा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -