दीपिका पादुकोणसाठी आजचा दिवस खास, जाणुन घ्या का?

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सर्व चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटात काम करणारी दीपिका आपल्या कामातून वेळात वेळ काढून वैयक्तिक आयुष्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी पहिले प्राधान्य देते. व्यस्त व्यवसायिक दिनाक्रमातून वेळ काढून दीपिका काही विशेष प्रसंग आपल्या कुटुंबासोबत साजरे करते.

वर्षाच्या सुरुवातीलाच कॅलेंडरवर विशेष दिवसांनच्या तारखांवर हायलाईट करून ठेवते. या खास दिवसांमध्ये कुटुंबातील व्यक्तींचे वाढदिवस आणि गणपती दिवाळीसारख्या सणांचा समावेश असतो. तिच्यासाठी हे दिवस खुप महत्वाचे असतात.

असाच एक खास दिवस म्हणजे 14 ऑगस्ट, कारण या दिवशी दीपिकाच्या आईचा वाढदिवस असतो. म्हणूनच आपल्या कुटुंबासोबत हा खास दिवस साजरा करण्यासाठी दीपिका बँगलोरला गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या खास दिवसासाठी एका कौटुंबिक भोजनाचे आयोजन करण्यात आले असून, या शॉर्ट ट्रिपमध्ये जितका होईल तितका वेळ दीपिका कुटुंबियांसोबत घालवणार आहे.

दीपिका अशी अभिनेत्री आहे जी कधीच कोणता दिखाऊपणा आणि खोटेपणा करत नाही. प्रत्येक वेळी हे सिद्ध केले आहे कि ती आपल्या कुटुंबाच्या किती जवळ आहे. एक मोठी मुलगी असल्याच्या नात्याने ती आपले कर्तव्य निभावणे व्यवस्थित जाणते, आणि हे या गुणी अभिनेत्रीने आज पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.