घरमनोरंजनकियारा-सिद्धार्थच्या लग्नात पाहुण्यांसाठी देशी नाश्त्याची सोय; जुही चावलाने शेअर केला फोटो

कियारा-सिद्धार्थच्या लग्नात पाहुण्यांसाठी देशी नाश्त्याची सोय; जुही चावलाने शेअर केला फोटो

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या लग्नाची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे त्यांच्या चाहत्यांमध्ये देखील त्यांच्या लग्नाची चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. लग्नाची जोरदार तयारी केल्यानंतर अखेर आज (7 फेब्रुवारी) ही जोडी कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत शाही पद्धतीने लग्न करतील. त्यांच्या लग्नाला 100 ते 125 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. ज्यामध्ये बॉलिवूडच्या काही कलाकारांच्या नावाचाही समावेश आहे.

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नात शाहीद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर देखील उरस्थित राहणार आहेत. शिवाय मनीष मल्होत्रा, करण जौहर आणि ईशा अंबानी देखील लग्नात हजर झाली आहे. अभिनेत्री जूही चावला देखील आपल्या पतीसोबत लग्नाला हजर झाली आहे. या खास पाहुण्यांसाठी लग्नात खास सोय करण्यात आली आहे.

- Advertisement -

लग्नात खास पाहुण्यांसाठी देशी नाश्त्याची सोय

कियारा-सिद्धार्थच्या लग्नात पाहुण्यांसाठी खास सोय करण्यात आली आहे. यावेळी सकाळच्या नाश्त्यामध्ये पाहुण्यांना देशी नाश्ता देण्यात आला. जूही चावलाने या नाश्त्याचा आस्वाद घेत एक पोस्ट शेअर केली आहे. जुहीने शेअर केलेल्या फोटोत ताटामध्ये पराठे, गूळ, दही, लस्सी दिसत आहे. हा देशी नाश्ता पाहून जूही चावलाने कौतुक केलं आहे.

- Advertisement -

4 वाजता होणार लग्न

सूर्यगढ पॅलेसमध्ये कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. कियारा-सिद्धार्थचं लग्न पंजाबी पद्धतीने पार पडणार आहे. आज दुपारी 3 वाजता सिद्धार्थची बँड-बाजासोबत शाही पद्धतीने वरात निघेल त्याच्या वरातील विन्टेज गाड्या, घोडे आणि ऊंट देखील असतील. वरातीची तयारी देखील आता पूर्ण झाली आहे. घोडा देखील तयार होऊन सूर्यगढ पॅलेसमध्ये पोहोचले आहेत. त्यानंतर 4 वाजता कियारा आणि सिद्धार्थ सप्तपदी घेतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता सूर्यगढ पॅलेसमधून राजस्थानी लोकगीतांचा आवाज ऐकू येत आहे. पॅलेसबाहेर घोडा, बँड-बाजा घेऊन वाजंत्री देखील उपस्थित झाले आहेत.


हेही वाचा :

कियारा-सिद्धार्थच्या लग्नविधींना सुरुवात; बँड-बाजा घेऊन वाजंत्री दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -