घरताज्या घडामोडीलॉकडाऊन-४ वर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी बोलवली उच्चस्तरीय बैठक

लॉकडाऊन-४ वर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी बोलवली उच्चस्तरीय बैठक

Subscribe

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यावर चर्चा करण्यासाठी सायंकाळी साडेचार वाजता बैठक होणार आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात कोणते निर्बंध असतील, कोणत्या गोष्टींवर सूट असेल यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.

आर्थिक पॅकेज जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठक बोलवली आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यावर चर्चा करण्यासाठी सायंकाळी साडेचार वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि अनेक ज्येष्ठ मंत्रीही उपस्थित असतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल हे स्पष्ट केलं की १७ मेपासून देशात लॉकडाऊन पुढे जाईल, पण या लॉकडाऊनमध्ये जीवन आणि अर्थव्यवस्था दोघेही पुन्हा रुळावर येऊ लागतील. यासाठी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्र्यांकडेही त्यांचा सल्ला मागविण्यात आला होता. या बैठकीत या सूचनांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लॉकडाऊन दरम्यान लोकांच्या गैरसोयीचा उल्लेख केला, पण लॉकडाउन पुढे जाईल की 17 मे रोजी संपेल यावर देशाचे लक्ष लागली होती. पंतप्रधानांनी आपल्या भाषणाच्या शेवटी हे चित्र जवळजवळ साफ केलं आणि म्हणाले की यावेळी लॉकडाऊन-४ नव्या रूपात असेल.

- Advertisement -

हेही वाचा – आर्थिक पॅकेजचा फायदा कोणाला? काय म्हणाले, आर्थिक सल्लागार संजीव सान्याल?


देशात प्रत्येक वेळी लॉकडाऊन वाढण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. सोमवारीही त्यांनी दोन टप्प्यांत मुख्यमंत्र्यांसमवेत मॅरेथॉन बैठक घेतली. लॉकडाऊन पुढे नेले पाहिजे, असं पाच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. पंतप्रधान म्हणाले होते की राज्यांच्या सूचनांच्या आधारे लॉकडाऊनची रुपरेषा तयार केली जाईल. लॉकडाऊन ३.० च्या वेळी, कोरोना संसर्गाच्या संदर्भात देश ग्रीन झोन, ऑरेंज झोन आणि रेड झोनमध्ये विभागला गेला. त्यानुसार सूट देण्यात आली. लॉकडाऊन ४ होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. मात्र, लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात कोणते निर्बंध असतील, कोणत्या गोष्टींवर सूट असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -