घरमनोरंजनरंगांची उधळण सोबतीला डीजे

रंगांची उधळण सोबतीला डीजे

Subscribe

रंगोत्सव म्हटला की तो सर्वांच्याच उत्साहाचा विषय असतो. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने उत्सवाचा आनंद घेत असतो. तरुणवर्गात मात्र त्यांच्या उत्साहाची विविध रुपं पहायला मिळतात. सोसायट्यांत, आपल्याच वस्तीत हे युवक या उत्सवाचा आनंद घेत असतात. त्यासाठी त्यांना परंपरेने आलेली वाद्ये आणि त्यावर ऐकवली जाणारी गाणी महत्त्वाची वाटतात. पाश्चिमात्य संस्कृतीच्या स्वाधीन झालेल्या युवक-युवतींच्या मात्र या उत्सवाच्या बाबतीत वेगळ्या संकल्पना आहेत. खाण्यापिण्याची रेलचेल, सोबतीला कृत्रिम पाऊस आणि नामांकीत असा डीजे असेल तरच हे युवक तिथे जास्त रेंगाळतात. अशा युवकांसाठी आलिशान हॉटेलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

ट्यूलिप स्टार इथे पार पडलेल्या रंगोत्सवाला नामांकीत डीजे कलाकार, गायक आले होते. मुंबईतल्या युवक-युवतींनी मोठ्या प्रमाणात पाश्चिमात्य संगीताचा आनंद घेतला असला तरी इथे कृत्रिम पावसाची सोय मात्र केलेली नव्हती. पाणीटंचाई हा त्यापाठीमागचा मुख्य उद्देश आहे. अर्णव शिरसाट ऑफ थर्ड रॉक यांनी या उत्सवाचे आयोजन केले होते. तरुणवर्गाची गैरसोय होऊ नये म्हणून याच परिसरात भव्यदिव्य दोन रंगमंच उभारलेले होते. गेल्या वर्षी शाहीद कपूरने अनपेक्षितपणे भेट दिल्यामुळे यंदासुद्धा सेलिब्रेटी कलाकार कार्यक्रमाला येतील, अशी आशा आयोजकांची होती. रंगोत्सवाला येणार्‍या युवकांमध्ये उत्साह जेवढा होता, तेवढीच निराशाही होती. त्याला कारण म्हणजे पोलीस सुरक्षा व्यवस्था बाहेर चोख ठेवण्यात आली होती. वाहन चालवणार्‍या आणि मद्यपान केलेल्या युवक-युवतींना याच गेट बाहेर परवानगी नाकारली जात होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -