घरताज्या घडामोडीCruise Drugs Case: मन्नतवर आलेल्या NCB पथकाला शाहरूख म्हणाला... अन् व्यक्त केली...

Cruise Drugs Case: मन्नतवर आलेल्या NCB पथकाला शाहरूख म्हणाला… अन् व्यक्त केली ‘ही’ इच्छा

Subscribe

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अनेक खुलासे होताना दिसत आहेत. आज याप्रकरणात आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून नाव समोर आलेली अभिनेत्री अनन्या पांडेची चौकशी सुरू आहे. काल, गुरुवारी याप्रकरणी अनन्याची दोन तास एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. मात्र ही चौकशी पूर्ण झाली नसल्यामुळे तिला आज देखील पुन्हा चौकशी करण्यासाठी बोलवले आहे. सध्या अनन्याची एनसीबी चौकशी करत आहे. यादरम्यान काल एनसीबी पथक मन्नतवर पोहोचल्यानंतर शाहरुख त्यांना काय म्हणाला, त्याने कोणती इच्छा व्यक्त केली, याबाबतचा खुलासा झाला आहे.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणी काल दुपारी एनसीबी वांद्रे आणि अंधेरी येथे पोहोचली. एनसीबी शाहरुख खानच्या मन्नतवर कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी पोहोचली होती. त्यादरम्यान शाहरुख खानने एनसीबीच्या पथकासोबत संवाद साधला. त्याने एनसीबीच्या कामाचे कौतुक केल्याची माहिती समोर आली आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना शाहरुख म्हणाला की, ‘तुम्ही सर्व चांगले काम करत आहात. पण लवकरच माझा मुलगा आर्यन तुरुंगातून घरी यावा, अशी माझी इच्छा आहे.’

- Advertisement -

२ ऑक्टोबरपासून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान घरापासून दूर आहे. त्याला जामीन मिळण्यासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत. येत्या मंगळवारी आर्यन खानच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत आर्यनला जर जामीन मिळाला नाहीतर त्याची दिवाळी तुरुंगात होईल. कारण ३० तारखेनंतर कोर्ट दिवाळीनिमित्ताने बंद असणार आहे.


हेही वाचा – मन्नत बंगल्यावर एनसीबी टीम का पोहचली ? समीर वानखेडेंनी सांगितले कारण

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -