घरमनोरंजनगुम्‍मू बिंदास भालूबरोबर एंजॉय करा ट्रीट

गुम्‍मू बिंदास भालूबरोबर एंजॉय करा ट्रीट

Subscribe

'भालू ये बिंदास है'मधील पोलार बेअर गुम्‍मूच्‍या बाबतीत आहे. हा शो गुम्‍मूच्‍या विलक्षण साहसी कृत्‍यांच्‍या लघुकथांना सादर करतो. गुम्‍मूचा अनोखा पेहराव, तसेच कोणत्‍याही संकटावर मात करण्‍याचा त्‍याचा निर्धार अशी खास कृत्ये लहान मुलांचे मनोरंजन करतील.

आपणा सर्वांचा एक असा मित्र असतो, जो अवखळ वागण्‍यासोबत आपल्‍याला हसवून-हसवून लोटपोट करतो. तरीदेखील तो आपल्‍याला इतका प्रिय असतो की, तो नेहमीच सर्व विषमतांवर मात करत विजयी ठरावा असे वाटते. असेच काहीतरी सोनी YAY! वरील नवीन शो ‘भालू ये बिंदास है’मधील पोलार बेअर गुम्‍मूच्‍या बाबतीत आहे. हा शो गुम्‍मूच्‍या विलक्षण साहसी कृत्‍यांच्‍या लघुकथांना सादर करतो. गुम्‍मूचा अनोखा पेहराव, तसेच कोणत्‍याही संकटावर मात करण्‍याचा त्‍याचा निर्धार अशी खास कृत्ये लहान मुलांचे मनोरंजन करतील. मूलत: डेव्हिड बॅकॅम म्‍हणून ओळखला जाणारा हा शो अत्‍यंत लोकप्रिय टीव्‍ही सिरीज आहे, जिला चॅनेलने देसी कथानकासह पुन्‍हा सादर केले आहे. त्‍याच्‍या विलक्षणतेला अधिक प्रशंसित करण्‍यासाठी चॅनेलने झूम सत्राच्‍या माध्‍यमातून १९ जून रोजी सायंकाळी ४ वाजता ‘बिंदास भालू की क्‍लास’ हा खास इव्‍हेण्‍ट देखील आयोजित केला आहे.

हे सत्र शोमधील कथांच्‍या निवडलेल्‍या स्निपेट्सना दाखवेल, जेथे गुम्‍मू प्रत्‍येकवेळी काहीतरी नवीन करताना त्‍याचे जीवन गोंधळाचे होऊन जाते. लहान मुलांना सुप्रसिद्ध चिल्‍ड्रन बुक इलस्‍ट्रेटर सुनयना देव यांनी आयोजित केलेल्‍या डूडल वर्कशॉपच्‍या माध्‍यमातून भालूच्‍या अस्‍सल स्‍टाइलमध्‍ये त्‍यांच्‍या सर्जनशीलतेला चालना देण्‍याची संधी देखील मिळणार आहे. डूडलिंगच्‍या विलक्षण कलाप्रकाराच्‍या माध्‍यमातून या लहान चाहत्‍यांना स्‍वत:ला अभिव्‍यक्‍त करण्‍याची, तसेच आपल्‍या कल्‍पनाशक्‍तीला वाव देण्‍याची पद्धत समजणार आहे. आर्ट मेनिया दि स्प्रिंगबोर्डच्‍या संस्‍थापक एडविना लोबोसह अधिक विलक्षण बनले आहे. त्‍या त्‍यांच्‍या आर्ट क्‍लासमध्‍ये लहान मुलांना कल्‍पनेपलीकडे जाऊन रंगसंगती करण्‍यास आणि त्‍यांच्‍या विलक्षणता सादर करण्‍यास प्रोत्‍साहित करणार आहेत.
तर मग, त्‍वरा करा आणि खालील लिंकवरील विशेष झूम धमाल सत्रामधील आपली सीट बुक करण्‍यासाठी किंवा १९ जून रोजी सायंकाळी ४ वाजता ब्रॅण्‍डच्‍या फेसबुक व यूट्यूब चॅनेलवर लाइव्‍ह मनोरंजनाचा आनंद घेण्‍यासाठी आजच नोंदणी करा.

- Advertisement -

हे हि वाचा – अश्लील गाण्यावर मी ॲक्टींग केली यासाठी माफ करा..रवि किशन

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -