घरमनोरंजनईशा गुप्ताने मागितली जाहीर माफी, म्हणाली...

ईशा गुप्ताने मागितली जाहीर माफी, म्हणाली…

Subscribe

ईशाने नायजेरियन फुटबॉल प्लेअरला वर्णभेदाच्या मुद्द्यावरुन मैदानाबाहेर अर्थात खेळाच्याबाहेर करावं, असं वक्तव्य केल्याची तक्रार नेटिझन्सनी केली होती.

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल यांनी महिलांविषयी केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य खूपच गाजलं. यावरुन बरेच आरोप-प्रत्यारोपही झाले. याच धर्तीवर अभिनेत्री ईशा गुप्ताने  हार्दिक-राहुलवर निशाणा साधला होता. ईशाने याप्रकरणाशी साधर्म्य साधणारी एक वर्णभेदी टीका केली होती. मात्र, या टिप्पणीवरुन आता ईशा वादात अडकली आहे. ईशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन तिच्या एका व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. या चॅटमध्ये फुटबॉलपटू अलेक्‍झांडर इवोबीच्‍या कामगिरीवरून ईशा आणि तिच्या मित्रांमध्ये चॅटिंग झाले होते. या चॅटमध्‍ये ईशाच्‍या मित्रांनी इवोबीला ‘गोरिल्ला’ म्‍हटले होते आणि त्‍याचा क्रमिक विकास (इव्‍होल्‍यूशन) थांबले आहे, असे म्‍हटले होते. यावर ईशाने उत्तर देत, ‘त्‍याला मैदानाबाहेर का ठेवण्‍यात आले नाही, मला माहिती नाही…’ अशी प्रतिक्रिया दिली होती. ‘ईशाने इवोबीला या खेळाडूला वर्णभेदाच्या मुद्द्यावरुन मैदानाबाहेर अर्थात खेळाच्याबाहेर करावं… असं वक्तव्य केलं आहे’, अशी टीका सर्व स्तरातील लोकांनी तिच्यावर केली होती.

इकडे महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हार्दिक पांड्या आणि के. राहुल यांना सामन्यातून बाहरेचा रस्ता दाखवण्यात आला होता. अशातच वर्णभेदाचा पुरस्कार करत ईशाने फुटबॉल खेळाडूला खेळाबाहेर करण्याचं वक्तव्य केल्यामुळे तिच्यावर टीकेची झोड उठली होती.

- Advertisement -


मला खंत आहे…

दरम्यान, ईशा गुप्ताने तिने केलेल्या वक्तव्याची ट्वीटरवरुन जाहीर माफी मागितली आहे. ‘मला लोकांनी केलेल्या टीकेचं खरंच दु:ख आहे. मी वर्णभेदी टीका केली असे लोकांना वाटले. मात्र, माझा तसा उद्देश नव्हता. मी एक खेळप्रेमी आहे. मी अशाप्रकराचं वक्तव्य करणं खूप चुकीचं आहे. पण माझं हे वक्तव्य अशाप्रकारे वर्णभेदी  ठरेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. तरी, माझ्या या मुर्खपणाबद्दल लोकांनी मला माफ करावे’. दरम्यान, ईशाने जाहीरपणे माफी मागितल्यानंतर आता लोक तिला ट्रोल करणं थांबवतील अशी अपेक्षा तिच्या चाहत्यांकडून वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकेकाळी हार्दिक पांड्या आणि ईशा गुप्ता यांनी एकमेकांना डेट केलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -