काळाचौकीच्या मराठी दांडियात रणवीरला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

रविवारी या महोत्सवात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याने हजेरी लावली होती. यावेळी रणवीरने हर हर महादेव, जय शिवाजी अशा घोषणा देखील दिल्या.

कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदा सर्वत्र सगळे सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. सध्या नवरात्रीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये देखील ठिकठिकाणी दांडिया महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक मोठमोठ्या ठिकाणी अनेक बॉलिवूड करांना आमंत्रित केले जात आहे. याचं निमित्ताने भारतीय जनता पार्टीकडून मुंबईत दांडिया महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. रविवारी या महोत्सवात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याने हजेरी लावली होती. यावेळी रणवीरने हर हर महादेव, जय शिवाजी अशा घोषणा देखील दिल्या.

मुंबईतील काळाचौकीच्या शहीद भगतसिंह मैदानात यावर्षी भाजपाने मराठी दांडिया महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहची एन्ट्री झाली. रणवीरला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी दांडियाच्या गाण्यावर रणवीरही थिरकला. त्याने बॉलिवूडमधील विविध गाण्यांवर ठेका धरला. तसेच या कार्यक्रमाच्या शेवटी रणवीरच्या हस्ते दोन विजेत्यांना आयफोन 11 देण्यात आला.

भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात नवरात्रीचे नऊ दिवस अनेक दिग्गज कलाकारांना आमंत्रित केले जाते. तसेच या दांडिया उत्सव पार पडल्यानंतर येथील विजेत्यांना आयफोन देखील भेट म्हणून दिला जातो.


हेही वाचा :

‘आदिपुरुष’च्या टीझरची प्रेक्षकांना भुरळ; सोशल मीडियावर होतेय तुफान चर्चा