घरमनोरंजन'सोशल मीडियावर निषेध करणं बंद करा आणि ऑगस्ट क्रांती मैदानावर या'

‘सोशल मीडियावर निषेध करणं बंद करा आणि ऑगस्ट क्रांती मैदानावर या’

Subscribe

नागरिकत्व दुरुस्ती कायद्या विरोधात फरहान अख्तरने मैदानात उतरण्याचं लोकांना आवाहन केलं.

देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलनाचे रुपांतर हिंसाचारामध्ये झालं आहे. तरुण मंडळी या कायद्या विरोधात एकजुट होऊन आंदोलन करत आहे. एका बाजूला या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून निषेध केला जातं आहे. तर दुसऱ्या बाजूला नेटकरी सोशल मीडियावरून या कायद्याच्या विरोधात बोलतं आहेत. अनेक कलाकार मंडळींनी देखील सोशल मीडियावरून जामिया विद्यापिठातील प्रकरणाबद्दल बोलतं आहेत. दिल्ली पोलिसांनी जामिया विद्यार्थ्यांवर कारवाई केल्यामुळे अनेक बॉलिवूड कलाकारांनी दिल्ली पोलिसांवर निशाणा साधला आहे. या सर्व गोष्टीचा पडसाद आता महाराष्ट्रात उमटताना दिसतं आहे. बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने आता सगळ्यांना मैदानात उतरण्याचं आवाहन केलं आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्या विरोधात सोशल मीडियावर निषेध करणं बंद करून आता ऑगस्ट क्रांती मैदानात भेटू असं फरहानने ट्विट केलं आहे.

फरहानने असं ट्विट केलं आहे की, ‘तुम्हाला हे आंदोलन इतकं महत्त्वाचं का आहे हे माहित असणं गरजचं आहे. म्हणून आपणं सर्वजणं १९ तारखेला मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात भेटू. आता सोशल मीडियावर निषेध करण्याची वेळं संपली आहे.’

- Advertisement -

फरहानने या ट्विटमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी यासंबंधीत माहितीदेखील शेअर केली आहे. तसंच लोकांनी हे आंदोलन का करावे हे स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी ८० वर्षीय आजी विकते ‘पाणी पुरी’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -