घरमनोरंजन‘फत्तेशिकस्त’मुळे ‘रिअल सुपरहिरो' गवसला

‘फत्तेशिकस्त’मुळे ‘रिअल सुपरहिरो’ गवसला

Subscribe

‘फर्जंद’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर महाराजांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन घडविणाऱ्या भारतातील पहिल्या सर्जिकल स्ट्राईकचा थरार १५ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. आपले भविष्य घडविण्यासाठी आपला वर्तमान सुरक्षित असणे गरजेचे असते. आपला गौरवशाली इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहचवायचा असेल तर त्याचं जतन आणि संरक्षण ही आपली जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाची, शौर्याची गाथा पुढच्या पिढीला समजावी यासाठी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘फत्तेशिकस्त’ चित्रपट शाळांतील विद्यार्थ्यांना दाखविण्यात येत आहे. राज्यभरातील असंख्य शाळांनी त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. चौथ्या आठवड्यात ही चित्रपटाची जोरदार घोडदौड महाराष्ट्रभरात सुरू आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील हणमंतवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेने इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवला. ठाणे शहरातील युवाशक्ती ग्रुपने स्वामी विवेकानंद आश्रम, येऊर येथील ७० मुलांना हा चित्रपट दाखवला. पुण्याच्या मॉडर्न हायस्कूल शाळेत शिकणाऱ्या सुमारे ६०० मुलांना हा चित्रपट दाखविण्यात आला. तसेच मंगळवारी १० डिसेंबरला मॉडर्न हायस्कूल गणेशखिंड पुणे यांनी आपल्या ८७५ विद्यार्थ्यासाठी ईस्क्वेअर टॉकीज येथे चित्रपटाच्या विशेष खेळाचे आयोजन केले आहे. या शाळांप्रमाणे इतर शाळांनी देखील यासाठी पुढाकार घेतला आहे. या पुढाकारामुळे राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महराजांच्या रूपाने ‘रिअल सुपरहिरो’ गवसता आला.

- Advertisement -

या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख, शिवछत्रपती आणि त्यांचे अनेक पैलू यांचे दर्शन तर घडतेच तसेच त्यांच्या युक्त्या, त्यांचे बुद्धीचातुर्य असे वेगवेगळे गुण ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवता आले, अशा भावना विद्यार्थ्य़ांनी चित्रपट पाहिल्यानंतर व्यक्त केल्यात.

मराठेशाहीचा इतिहास हा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेच, त्यासोबतच खूप रोमांचक, थरारक आणि अभिमानास्पद आहे. शिवाजी महाराजांनी अल्पशा सैन्यबळाच्या जीवावर अनेक लढाया यशस्वी केल्या. या गोष्टी विद्यार्थ्यांना कळेल अशा भाषेत सांगत खरा इतिहास त्यांना समजवून सांगण्याचा आमचा प्रयत्न विविध शाळांनी दिलेला प्रतिसाद पाहता सफल झाल्याच्या भावना दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी बोलून दाखवल्या. या चित्रपटाच्या निमित्ताने सुपरमॅन, स्पायडरमॅन, बॅटमॅन यांना सुपरहिरो मानणाऱ्या आजच्या लहानग्यांना छत्रपती शिवाजी महराजांच्या रूपाने ‘रिअल सुपरहिरो’ अनुभवायला मिळत आहे.

- Advertisement -

‘फत्तेशिकस्त’च्या निमित्ताने मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांची फौज पुन्हा एकदा एकत्र आली आहे.


हेही वाचा – सोहम स्वीकारले का अभिजीत आणि आसावरीचं नातं?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -