Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन सलील कुलकर्णी यांना कोरोनाची लागण

सलील कुलकर्णी यांना कोरोनाची लागण

बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टीवरही कोरोनाची लागण कलाकारांना झाल्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Related Story

- Advertisement -

जगभरात कोरोनाचे सावट थैमान घालत आहे. सर्वसामान्यांपासून ते अगदी मोठमोठ्या लोकांपर्यंत कोरोनाने सर्वांनाच विळखा घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडसृष्टीमध्ये एकामागोमागएक कलाकाराला कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. आता बॉलीवूडसृष्टीनंतर मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, प्रसिद्ध लेखक, संगीतकार आणि गायक डॉ. सलील कुलकर्णी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोशल मिडियावर स्वत: पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. सलील कुलकर्णी यांनी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे समजताच त्यांनी ट्वीटद्वारे कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे सांगितले आहे. ‘सर्वतोपरी काळजी घेऊनही आज माझी कोविड-१९ टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. घरीच क्वारंटाइन करुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व औषधे सुरु करण्यात आली आहेत. गेल्या आठवड्यात मला जे जे भेटले त्यांना कल्पना मिळावी, या दृष्टीने हे ट्वीट केले आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. दरम्यान, कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टीवरही कोरोनाची लागण कलाकारांना झाल्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या अगोदर बॉलीवूड अभिनेता अमिर खान, आर माधवान, कार्तिक आर्यन, परेश रावल आणि अभिनेत्री फातिमा सना शेख या कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे.


हेही वाचा – काँग्रेसमुळे सरकार, आमच्या नेत्यांवर टीका करणं थांबवा; नाना पटोलेंचा राऊतांना इशारा

- Advertisement -