Bigg Boss 15 OTT च्या घराची पहिली झलक पाहिलीत का?

यंदाच्या बिग बॉस १५ मध्ये एकूण १५ सेलिब्रेटी स्पर्धक सहभागी होणार आहेत.

first glimpse of Bigg Boss 15 OTT's house
Bigg Boss 15 OTT च्या घराची पहिली झलक पाहिलीत का?

बिग बॉस १५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे. त्या आधी बिग बॉसच्या घराचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यात बिग बॉसच्या घराचा नवा चेहरा पहायला मिळत आहे. बिग बॉसचे हे पहिले पर्व आहे जे टेलिव्हिजन नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे. बिग बॉस १५ ओटीटी करण जौहर होस्ट करत आहे. प्रोमोमध्ये करणने बिग बॉसच्या घराचे दरवाजे उघडले. ‘आता काही दिवसांची प्रतिक्षा,आम्ही थाळी घेऊन आरतीसाठी तयार आहोत’,असे म्हणत बिग बॉस १५ ओटीटीचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.  (first glimpse of Bigg Boss 15 OTT’s house)

 

View this post on Instagram

 

A post shared by Voot (@voot)

बिग बॉसच्या घराची सुरुवात एका मोठ्या आलीशान हॉलने होते. त्याचप्रमाणे घरात लिविंग रुम, बाथरुम, किचन एरिया आणि डायनिंग एरिया देखील आहे. घराच्या बाहेर सुंदर ग्रीन गार्डन आणि स्विमिंग पूल देखील पहायला मिळत आहे.

यंदाच्या बिग बॉस १५ मध्ये एकूण १५ सेलिब्रेटी स्पर्धक सहभागी होणार आहेत. ८ ऑगस्ट पासून बिग बॉस १५ प्रेक्षकांना २४ तास ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. बिग बॉसचे हे पर्व इतर पर्वांपेक्षा वेगळे असणार आहे अशा चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत. बिग बॉस सुरू झाल्यानंतर नेमकं काय पहायला मिळणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

बिग बॉस १५ मध्ये अभिनेत्री अक्षरा सिंह, करण नाथ, नेह भसीन, प्रतिक सहजपाल, दिव्या अग्रवाल, अनुषा दांडेकर, रिद्धिमा पंडित, त्याचप्रमाणे उर्फी जावेद,मनस्वी वशिष्ठ, जीशान मलिक, नेहा मलिक आणि पवित्र लक्ष्मी हे स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत.


हेही वाचा – Pornography Case: राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; चार माजी कर्मचारी झाले साक्षीदार, केले खळबळजनक खुलासे