घरमनोरंजनमाझ्यावरही झाला होता अन्याय, आणखी एका अभिनेत्रीचा खुलासा

माझ्यावरही झाला होता अन्याय, आणखी एका अभिनेत्रीचा खुलासा

Subscribe

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्यांच्यात काही वाद झाले. आणि गौरांगने फ्लोराला मारहाण केली. यात ती जबर जखमी झाली. त्यानंतर गौरांगने तिला कोणत्याही सिनेमात काम मिळणार नाही अशी धमकी दिली.

तनुश्री दत्ताने २००८ साली झालेले एक प्रकरण पुन्हा एकदा बाहेर काढलं आणि सबंध बॉलिवूड हादरुन गेलं. हॉर्न ओके प्लीजच्या सेटवर नाना पाटेकर यांनी मला चुकीच्या पद्धतीने हात लावण्याचा प्रयत्न केला असा तिचा आरोप होता. तनुश्रीनंतर आता अनेक अभिनेत्री त्यांच्यावर झालेल्या अन्यायासंदर्भात सोशल मीडियातून व्यक्त होत आहेत. आता आणखी एका अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला आहे. फ्लोरा सैनी असे या अभिनेत्रीचे नाव असून निर्माता गौरांग दोषी विरोधात ही पोस्ट लिहीत झालेली आपबिती सांगितली आहे.

वाचा- संस्कारी बाबूंवरही बलात्काराचा आरोप, लेखिकेची खळबळजनक पोस्ट

नेमकं प्रकरण काय?

२००७ साली घडलेली ही घटना असून फ्लोराचे निर्माता गौरांग याच्यासोबत प्रेमसंबंध होते. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्यांच्यात काही वाद झाले. आणि गौरांगने फ्लोराला मारहाण केली. यात ती जबर जखमी झाली. त्यानंतर गौरांगने तिला कोणत्याही सिनेमात काम मिळणार नाही अशी धमकी दिली. शिवाय मला जे काही प्रोजेक्टस मिळाले होते ते माझ्याकडून काढून घेण्यात आले. मी गौरांग संदर्भात काही बोलेन त्यामुळे सगळ्यांनी माझ्याशी बोलणे सोडले. आता मी यातून बाहेर पडले आहे, अशा आशयाची फेसबुक पोस्ट लिहित तिने तिचे २००७ साली मारहाण झालेले फोटो देखील शेअर केला आहे.

- Advertisement -

कोण आहे फ्लोरा सैनी?

फ्लोरा सैनी हिने नुकत्यात श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या स्त्री या सिनेमात चुडैलची भूमिका केली होती. तिने अनेक दिग्गज कलाकारांसोबत आतापर्यंत काम केलेली आहेत. दाक्षिणात्य सिनेमात तिने काम केले असून रजनीकांत, विजयकांत, प्रभू, कार्तिक इ. जणांसोबत तिने काम केले आहे. या शिवाय दबंग २, धनक, लक्ष्मी और बेगमजान या सिनेमात ती दिसली आहे. आतापर्यंत तिने ५० हून अधिक सिनेमांमध्ये काम केली आहेत.

- Advertisement -

कोण आहे गौरांग दोषी?

gaurang_doshi
निर्माता गौरांग दोषी

गौरांग दोषी सिने निर्माता असून त्याने दिवार , आंखे या हिंदी सिनेमाची निर्मिती केली आहे. २००७ साली फ्लोराला मारहाण केल्याप्रकरणी त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याने फ्लोराला मारहाण केल्यानंतर धमकीचे मेसेज देखील केले होते. या नंतर आणखी एका नेपाळी अभिनेत्रीने गौरांगवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला होता.

पाहा- तनुश्रीचे नाना नारे!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -