घरमहाराष्ट्रबोगस कर्ज वाटपामुळे कराड जनता बँक सहकारी अडचणीत; संचालकासह 27 जणांवर गुन्हे...

बोगस कर्ज वाटपामुळे कराड जनता बँक सहकारी अडचणीत; संचालकासह 27 जणांवर गुन्हे दाखल

Subscribe

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी बँक म्हणून ओळख असलेली साताऱ्यातील कराड जनता सहकारी बँक आता बोगस कर्ज प्रकरणामुळे चांगलीच अडचणीत सापडली आहे. या प्रकरणी रविवारी रात्री बँकेच्या संचालकासह शासकीय अधिकाऱ्यांविरोधात कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 12 जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोट्यावधी रुपयांचे बोगस कर्ज वाटप केल्याने ईडीमार्फत सध्या या बँकेची चौकशी सुरु आहे. यात ज्या लोकांना सर्वात मोठ्या रकमेचे कर्ज देण्यात आले त्या कर्जदारांचीही ईडीकडून चौकशी सुरु आहे. यात आता बँकेतील कर्मचाऱ्यांच्याच नावे कर्ज घेतल्याचे समोर आल्याने पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले. यानंतर रात्री कराड पोलिसांनी बोगस कर्ज वाटप प्रकरणी 27 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बँकेचे कर्मचारी राजेंद्र देसाई यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

कराड जनता बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेश पाटील वाठारकर, जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास सुर्यवंशी, संचालक विकास धुमाळ, राजीव शहा, सुरेश लाहोटी, दिलीप चव्हाण, आकाराम शिंगण, दिनकर पाटील, शंकरराव काटे, प्रकाश तवटे, शिवाजी पाटील, वसंतराव शिंदे, रमेश गायकवाड, डॉ परेश पाटील, संजय घोक्षे, राजेंद्र पाटोळे, प्रतिभा पाटील, ज्योती शहा, अनिल यादव, संजय जाधव, विजयकुमार डुबल, दीपक पाटणकर, बाजीराव पाटील, अरुण पाटील आणि भाऊसाहेब थोरात, अशा एकूण 27 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कराड जनता सहकारी बँकेचे तत्कालीन संचालक मंडळातील वरील सगळ्यांवर बँकेतील 296 कर्मचाऱ्यांच्या नावे 2016 मध्ये सुमारे 4 कोटी 52 लाख 87 हजाराचे कर्ज घेतले. हेच कर्ज नंतर 2017 मध्ये घेतल्याचे दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. ही कर्जाची रक्कम राजेश पाटील वाठारकर यांच्यासह त्यांच्या तीन मित्रांच्या नावे वर्ग करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी बँकेचे कर्मचारी राजेंद्र देसाई यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली. त्यानुसार आता न्यायालयाने या सर्व प्रकरणाची चौकशी करत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणातील सर्वांवर गुन्हे दाखल केले आहे.


नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून जेईई सत्र 2 परीक्षेचा निकाल जाहीर


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -