Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'हॅरी पॉटर'मधल्या पद्मा पाटीलने दिली चाहत्यांना गुड न्यूज!

‘हॅरी पॉटर’मधल्या पद्मा पाटीलने दिली चाहत्यांना गुड न्यूज!

Related Story

- Advertisement -

हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध ‘हॅरी पॉटर’ (Harry Potter) चित्रपटात आपल्या अभिनयाने मनं जिंकणारी अभिनेत्री अफशान आझाद (Afshan Azad) तुम्हाला माहित असेलच. अफशानला ‘हॅरी पॉटर’ चित्रपटासाठी जास्त ओळखले जाते. या चित्रपटात अफशानने पद्मा पाटीलची भूमिका साकारली होती. चाहत्यांना अफशाची भूमिका खूपच आवडली होती. नुकतेच अफशाने आपला पती नाबिल काझी (Nabil Kazi ) सोबत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या माध्यमातून तिने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. अफशानच्या घरी जुलै महिन्यात नवा पाहूणा येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Official Afshan (@afshanazad)

अफशान आझादने जो फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये ती आपला बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या फोटोमध्ये अफशान आणि पती नाबिल आनंदी दिसत आहेत. आपल्या पहिल्या बाळाचा आनंद त्या दोघांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. या फोटोसोबत अफशान आझानने लिहिले आहे की, ‘आता सर्वांसाठी एका सीक्रेटचा खुलासा करत आहे. मी आई बनणार आहे. आतापर्यंतचे सर्वात मोठे गिफ्ट देण्यासाठी अल्लाहचे आभार. बेबी काझी जुलै महिन्यात येणार आहे. आम्ही दोघे खूश असून थोडे नर्वस देखील आहोत. सगळ्यांनी आमच्यासाठी प्रार्थना करा.’

- Advertisement -

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर हॉलिवूडचा सुप्रसिद्ध चित्रपट ‘हॅरी पॉटर’ची सीरीजमध्ये २००५ वर्षापासून ते २०११ पर्यंत अफशान आझाद ने काम केले होते. ज्यामध्ये तिने पद्मा पाटीलची भूमिका केली होती. चित्रपटसृष्टीतील सर्वात चर्चेत असणारा ‘हॅरी पॉटर’ चित्रपट आहे.


हेही वाचा – ‘हा’ अभिनेता पार पाडणार ‘सत्यशोधक’ मध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंची भूमिका


- Advertisement -

 

- Advertisement -