घरताज्या घडामोडीHBD Karishma Kapoor: करिश्माने केला लग्नाविषयी खुलासा, म्हणाली प्रेग्नंट असताना सासू करत...

HBD Karishma Kapoor: करिश्माने केला लग्नाविषयी खुलासा, म्हणाली प्रेग्नंट असताना सासू करत होती छळ

Subscribe

तब्बल ११ वर्षे संसार करुन करिश्मा आणि संजय यांचे सूर जुळू शकले नाहीत.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर करिश्मा कपूर आज तिचा ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. करिश्माच्या फिल्मी करिअर आणि फिटनेसच्या अनेक गोष्टी तिच्या चाहत्यांना ठावूक आहेत. करिश्माचा जन्म १९७४ झाला. करिश्माचे टोपण नाव लोलो आहे. वयाच्या १५ व्या वर्षांपासून करिश्मा अभिनय करत आहे. अभिनेत्री होण्यासाठी तिने तिचे शिक्षण देखील अर्धवट सोडले. अभिनेता आमिर खान सोबत आलेला करिश्माचा राजा हिंदुस्तानी हा सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमाने करिश्माला नवी ओळख मिळवून दिली. त्याचप्रमाणे राजा बाबू, कुली नंबर १, साजन चले ससुराल, हिरो नंबर १, बीवी नंबर १,हम साथ साथ है,दिल तो पागल हैं यासारखे अनेक सुपरहिट सिनेमे करुन प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. करिश्माने तिच्या लग्नाविषयी अनेक वेळा महत्वाचे खुलासे केले आहेत. त्याविषयी जाणून घेऊया. (HBD Karishma Kapoor: Karishma reveals about marriage, says mother-in-law was harassing her while she was pregnant)


२००२मध्ये करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचा साखरपुडा झाला. जया बच्चन यांनी करिश्मा आपली सून होणार हे देखील सर्वांना सांगितले. मात्र पुढे त्यांच्या साखरपुडा मोडला. त्यानंतर करिश्माने बिझनेस मॅन असलेल्या संजय कपूर याच्याशी लग्न केले. तब्बल ११ वर्षे संसार करुन करिश्मा आणि संजय यांचे सूर जुळू शकले नाहीत. त्यांनी घटस्फोट घेतला आणि वेगळे झाले. मात्र त्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे करिश्माकडून करण्यात आले. करिश्मा आणि संजय यांच्या हनिमून वेळी संजयने आपल्या मित्रासोबत माझी बोली लावली होती. त्याच्या मित्रासोबत एक रात्र राहण्यासाठी त्याने मला जबरदस्ती केल्याचे करिश्माने म्हटले होते. करिश्माने केवळ पैशांसाठी माझ्यासोबत लग्न केल्याचे संजयने सर्वांना सांगितले होते.

- Advertisement -

पुढे करिश्माने आणखी एक धक्कादायक खुलासा केला, करिश्मा प्रेग्नंट असताना तिच्या सासूकडून तिचा शरीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला होता असा आरोप केला होता. गोष्टी माझ्या हाताबाहेर गेल्यानंतर माझ्याकडे काही पर्याय उरला नाही. त्यानंतर मी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली असे करिश्माने म्हटले. करिश्मा सध्या सिंगल लाईफ मजेत जगत आहे. तिच्या फिटनेस विषयी सुद्धा जोरदार चर्चा सुरु असते.

- Advertisement -

हेही वाचा – 30Years of SRK: शाहरुख खानची सिनेसृष्टीत ३० वर्षे, शेअर केली भावूक पोस्ट

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -