घरताज्या घडामोडीHijab Row : हिजाब वादावर Sonam Kapoor ची प्रतिक्रिया ; म्हणाली, 'पगड़ी...

Hijab Row : हिजाब वादावर Sonam Kapoor ची प्रतिक्रिया ; म्हणाली, ‘पगड़ी है, तो हिजाब क्यों नहीं’

Subscribe

कर्नाटकमध्ये घडलेल्या हिजाब प्रकरणावरुन देशभरातील वातावरण तापलं आहे. या हिजाब प्रकरणावर बड्या नेत्यांपासून सेलिब्रिटी आणि सोशल मिडियावरील नेटकऱ्यांकडून आपली मत मांडली जात आहेत. कर्नाटकमधील हिजाब प्रकरण वाढतच चालले आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून या प्रकरणावर संताप व्यक्त केला जात आहे. नुकतंच बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरने हिजाब प्रकरणी एक पोस्ट शेअर केली आहे

कर्नाटकमध्ये घडलेल्या हिजाब प्रकरणावरुन देशभरातील वातावरण तापलं आहे. या हिजाब प्रकरणावर बड्या नेत्यांपासून सेलिब्रिटी आणि सोशल मिडियावरील नेटकऱ्यांकडून आपली मत मांडली जात आहेत. कर्नाटकमधील हिजाब प्रकरण वाढतच चालले आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून या प्रकरणावर संताप व्यक्त केला जात आहे. नुकतंच बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरने हिजाब प्रकरणी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट आता सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोनम कपूरने शेअर केली पोस्ट

सोनम कपूरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये एक फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोमध्ये पगडी बांधलेला एक व्यक्ती दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला हिजाब घातलेली एक महिला दिसत आहे. पगडी बांधलेल्या माणसाच्या डोक्यावर लिहिले आहे की, ‘पगडी घालणे एक चॉईज असू शकते’. त्याचप्रमाणे हिजाब घातलेल्या महिलेच्या डोक्यावर लिहिले आहे की, मग हिजाब ही कपडे घालण्याची चॉईज नाही का?’ खरतरं या पोस्टमध्ये सोनमने काहीतरी लिहिले आहे. मात्र, फोटोच फार बोलका आहे. शिख युवक पगडी घालू शकतात तर मग,मुस्लिम महिला हिजाब का नाही? असा सवाल तिने या पोस्टमधून विचारला आहे. सोनम कपूरने हिजाबची तुलना पगडीशी केली आहे.

- Advertisement -

या अगोदर शर्लिन चोप्रा आणि उर्फी जावेद देखील या हिजाब प्रकरणावर रिअॅक्ट झाली आहे. कर्नाटकमध्ये घडलेल्या हिजाब प्रकरणावरुन देशभरातील वातावरण तापलं आहे. या हिजाब प्रकरणाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटताना दिसून येत आहेत.

- Advertisement -

नेमके काय आहे प्रकरण?

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमधील शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थींनींना हिजाब घालण्यास बंदी घालण्यात आली. यास मुस्लीम विद्यार्थीनींनी विरोध दर्शवला आहे. तर दुसरीकडे मुस्लीम विद्यार्थीनींच्या या मनमानीविरोधात अनेक विद्यार्थी एकत्र आले असून गळ्यात भगवा स्कार्फ आणि भगवी टोपी घालून याचा विरोध करत आहे. यामुळे कर्नाटकमध्ये धार्मिक वाद पेटण्याची चिन्हे आहेत. हे प्रकरण उच्च न्यायालायत पोहचले असून त्यावर सुनावणी सुरू आहे.


हे ही वाचा – Karnataka Hijab Row: कर्नाटकमधला हिजाब वाद, नेमके काय आहे प्रकरण?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -