बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद यांचे नाते गेल्या काही दिवसांपासून अधिक घट्ट होत आहे. हे कपल एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्यास कधीही मागेपुढे पाहत नाहीत आणि बहुतेक वेळी हे दोघे एकत्र असतात. हृतिक आणि सबा नुकतेच पुन्हा एकदा एकत्र दिसले.
सबाला हृतिक आणि त्याच्या मुलांसोबत अनेकदा पाहण्यात आलं आहे. ‘वॉर’ अभिनेता त्याच्या दोन्ही मुलांसह आणि सबासोबत शुक्रवारी रात्री दिसला. चित्रपट पाहून हे चौघे थिएटरमधून बाहेर पडताना दिसले.

एका व्हायरल व्हिडिओमध्ये हृतिक रोशन आणि सबा आझाद फंकी कपड्यांमध्ये मस्त दिसत आहेत. तसेच हृतिक निळ्या टी-शर्टवर एक राखाडी हुडी जिपर जॅकेट घातले होते जे खाकी ट्रॅक पॅंटसला एक कॉम्बिनेशन लूक देत होते. तर दुसरीकडे, सबा, काळ्या रंगाच्या क्रॉप टॉपमध्ये हॉट दिसत होती. तिने ब्लू लूज फिट डेनिम्ससह पेअर केली होती आणि तिच्यासोबत एक बॅग होती. थिएटरमधून बाहेर पडताना, सर्वप्रथम हृतिकची दोन्ही मुले बाहेर पडली आणि कारमध्ये बसली आणि त्यानंतर हे जोडपेही एकत्र बाहेर आले.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत हृतिक त्याच्या गाडीतून उतरून एअरपोर्टवर येताना दिसतोय. यावेळी त्याच्याबरोबर सबा आणि त्याची दोन मुलंही आहेत. हृतिक अनेकदा सुझान आणि त्याच्या मुलांबरोबर एकत्र दिसतो पण आता तो फॅमिली सोबत सुट्ट्यांचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे. तसेच हा व्हायरल व्हिडिओ बघून नेटकऱ्यांनी कॉमेंट्स दिल्या आहेत.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -