घरमनोरंजनVideo: सैफच्या चिमुकल्या भाचीने उच्चारले 'गायत्री मंत्र'; जिंकतेय नेटिझन्सचे मन

Video: सैफच्या चिमुकल्या भाचीने उच्चारले ‘गायत्री मंत्र’; जिंकतेय नेटिझन्सचे मन

Subscribe

सोशल मीडियावर इनायाचा व्हिडिओ होतोय चांगलाच व्हायरल

सोहा अली खान-कुणाल खेमूची मुलगी आणि सैफ अली खानची भाची इनाया नौमीचा हॅलोविन दिवसाचा गोंडस फोटो व्हायरल झाल्यानंतर इनाया नौमीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चिमुरडी इनाया बोबड्या स्वरात गायत्री मंत्र बोलताना दिसत आहे. हा मंत्र तिने भाऊबीजेच्या दिवशी बोलल्याचे दिसतेय. लहानग्या इनायाचा हा व्हिडिओ बघून चाहते हैरान झाले आहेत. तिच्या या व्हिडिओवर अनेक नेटिझन्सच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत.

- Advertisement -

इनाया नौमीच्या या गायत्री मंत्राच्य़ा उच्चाराने अनेक नेटिझन्सचे मन जिंकले आहे. इनायाने उच्चारलेल्या गायत्री मंत्राचे कौतुक नेटकऱ्यांकडून तर होतच आहे मात्र तिच्या सुंदर डोळ्यांचे देखील कौतुक होत आहे. नुकताच इनायाने हॅलोविन डे देखील साजरा केला. त्या फोटोंना देखील नेटकऱ्यांकडून पसंती मिळताना दिसत आहे.

इनाया खेमूचा गोंडस हॅलोविन!

सोहा अली खाननं इनायाचं हॅलोविन करीता इन्स्टाग्रामवर दोन पोस्ट केले आहेत आणि इनायाच्या क्यूटनेसनं सगळेच चाहते तिच्या प्रेमात पडलेले आहेत.

View this post on Instagram

Peek a boo!! ? #happyhalloween

A post shared by Soha (@sakpataudi) on

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -