घरमनोरंजनपहिल्याच सिनेमातून एक्झिट झाल्याने रात्रभर रडला होता इरफान खान

पहिल्याच सिनेमातून एक्झिट झाल्याने रात्रभर रडला होता इरफान खान

Subscribe

आज इरफान खान याची तिसरी पुण्यतिथी आहे. २९ एप्रिल,२०२० रोजी न्युरो इंडोक्राइन ट्युमरमुळे त्याचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले. भले आज तो आपल्यात नाही पण नेहमीच त्याला बॉलिवूड मधील एका उत्तम कलाकारांपैकी एक मानले जाते.

NSD पासून सुरु झालेला अभिनयाचा प्रवास त्याने ३० वर्ष केला. इरफानने जवळजवळ ६९ सिनेमांमध्ये काम केले आणि पद्मशीसह काही पुरस्कार ही पटकावले. पण येथवर पोहचण्याचा त्याचा प्रवास हा फार खडतर होता. त्याचे सिनेमावर ऐवढे प्रेम होते की, त्याने आईशी खोटं बोलून अभिनय शिकण्यासाठी NSD ला गेला. पण जेव्हा पहिल्या सिनेमात त्याला रोल दिला नाही तेव्हा तो संपूर्ण रात्रभर रडला होता.अशातच आज त्याच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्याचे खास किस्से पाहूयात.

- Advertisement -

इरफान खान याचा जन्म राजस्थान मधील एका संपन्न परिवारात झाला होता. त्याचे वडील याशीन अली खान आणि आई सईदा बेगम खान. वडिलांचा टायरचा व्यवसाय होता. इरफानच्या वडीलांना शिकार करण्याची फार आवड होती. त्यामुळे ते कधीकधी इरफानला आपल्या सोबत शिकारीसाठी घेऊन ही जायचे. इरफान तेथे बंदूक चालवायचा पण कधीच त्याने शिकार केली नाही. ऐवढेच नव्हे तर तो नॉन-वेज ही खायचा नाही. यामुळे त्याचे वडिल नेहमीच असे म्हणायचे की, पठानच्या परिवारात एका ब्राम्हणाने जन्म घेतला आहे.

इरफानच्या आईला तो इंग्रजी माध्यमातून शिकावे असे वाटत होते. त्यानुसार त्याने इंग्रजी शाळेत प्रवेश ही घेतला. तसेच त्याच्या आईचे स्वप्न होते की, त्याने लेक्चरर व्हावे. पण वडिलांना असे वाटत होते की, त्याने त्याला आवडीचे असे काहीतरी शिकावे आणि नोकरी सुद्धा करु नये.

- Advertisement -

घरात सिनेमा पाहण्यास बंदी
इरफानला लहानपणापासूनच सिनेमा फार आवडायचा आणि त्याचे त्यावर प्रेम ही होते. पण त्याला ते कळत नव्हते. घरात ही सिनेमा पाहण्यास विरोध होता. जेव्हा घरात त्याचे काका यायचे तेव्हा ते सर्व मुलांना सिनेमा पाहण्यासाठी घेऊन जायचे. याच दरम्यान त्याने जे सिनेमे पाहिले ते सर्व मनोरंजनासाठीच होते. पण त्यानंतर त्याने नसीरुद्दीन शाह आणि दिलीप कुमार यांचे सिनेमे १० वी आणि १२ वी दरम्यान पाहिले तेव्हा त्याच्यावर त्यांचा एक वेगळाच प्रभाव पडला. त्यानंतर आपण ही कलाकार होऊ शकतो असे त्याला वाटू लागले.

मिथुन चक्रवर्तींना पाहून वाटले की…
इरफान खान याला कलाकार व्हायचे होतेच पण या स्वप्नाबद्दल घरी सांगण्याची त्याला हिंमत होत नव्हती. त्याला असे वाटायचे की, लोक त्याची खिल्ली उडवती, पण काही काळानंतर त्याने त्याच्या मित्राला याबद्दल सांगितले की, त्याला कलाकार व्हायचे आहे. त्याचसोबत हे सुद्धा सांगितले की, यावर मात्र त्याची मस्करी करु नये. दोन दिवस मित्र यावर काही बोलला नाही, ना कोणत्या गोष्टीवरुन त्याची खिल्ली उडवली.

त्यानंतर इरफानच्या मनात असा प्रश्न आला की, माझ्या सारखा दिसणारा खरंच कलाकार होऊ शकतो का? याच दरम्यान त्याने मिथुन चक्रवर्ती याचे सिनेमे पाहिले तेव्हा त्याला अधिक प्रोत्साहन मिळाले की, तो सुद्धा कलाकार होऊ शकतो.


हेही वाचा-इरफान खान पुन्हा पडद्यावर दिसणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -