घरमनोरंजनकपिल शर्मा ट्रोलवर भडकला, म्हणाला ५० रूपयांच्या रिचार्जवर अक्कल नको पाजळू

कपिल शर्मा ट्रोलवर भडकला, म्हणाला ५० रूपयांच्या रिचार्जवर अक्कल नको पाजळू

Subscribe

देशभरात सध्या नव्या कृषी विधेयकावर विरोध करण्यासाठी पंजाबमधील शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे. नवीन कृषी विधेयकावर शेतकऱ्यांची बाजू घेत कॉमेडियन कपिल शर्मा यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल मत मांडले आहे. पण हे मत मांडतानाच कपिल शर्मा यांना ट्विटरवर ट्रोल करण्यात आले आहे. कपिल शर्मा यांनीही आपल्या अंदाजात या ट्रोलर्सने नेमक्या शब्दात सडेतोड उत्तर दिले आहे. मी माझे काम तर करतच आहे, तुम्ही पण तुमच काम करा, उगाच ५० रूपयांचे रिचार्ज करून फालतूची अक्कल पाजळू नका अशा शब्दात आपल्यावर होणाऱ्या टीकेला कपिल शर्मा यांनी उत्तर दिले आहे.

काय होत कपिल शर्मा यांचे ट्विट

शेतकऱ्यांच्या मुद्द्याला राजनैतिक रंग न देता, यावर काहीतरी तोडगा निघायला हवा, असे मत कपिल शर्मा यांनी व्यक्त केले होते. कोणताच मुद्दा इतका मोठा नसतो, ज्यावर चर्चेतून मार्ग निघत नसतो. आम्ही सर्वजण देशातल्या शेतकरी बांधवांसोबत आहोत. शेतकरी आमचे अन्नदाता आहेत.

- Advertisement -

पण कपिल शर्मा यांच्या या ट्विटचा समाचार घेत काही ट्विटरवरील समर्थकांनी मात्र कपिल शर्मा यांना टार्गेट केले आहे. एका ट्विटर युजरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की कपिल शर्मा, तुम्ही गपचुप कॉमेडी करा, राजकारण करू नका. शेतकऱ्यांचे हितचिंतक असल्याचे उगाच दाखवू नका, जे तुझ काम आहे त्यावर फोकस कर अशा शब्दात या ट्विटर युजरने कपिल शर्माला चिमटा काढला आहे. या ट्विटवर कपिल शर्मा यांनीही तितक्यात हजरजबाबीपणे उत्तर दिले आहे.

- Advertisement -

कपिल शर्माचे ट्विट

भाऊ साहेब मी माझच काम करत आहे. आपणही आपल काम कराव, देशभक्त लिहिल म्हणून कोणी देशभक्त होत नाही, काम करा आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्या. उगाच ५० रूपयांचा रिचार्ज करून फालतूचे ज्ञान वाटू नका. धन्यवाद.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -