घरताज्या घडामोडीकपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीचा विवाह, कपिलनं केला भन्नाट डान्स

कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीचा विवाह, कपिलनं केला भन्नाट डान्स

Subscribe

बॉलिवूडचा प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने त्याच्या "किस किस को प्यार करू" या पहिल्या चित्रपाटातील ऑनस्क्रीन पत्नी अभिनेत्री सिमरन कौर मुंडी हिच्या लग्नात मस्त डान्स केला आहे. याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध कॉमेडीअन आणि अभिनेता कपिल शर्मा आपल्या कॉमेडी स्वभावामुळे प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस पडतो. त्याच्या कॉमेडीअन अंदाजाने तो प्रेक्षकांना नेहमीच पोट धरून हसायला भाग पाडतो. कपिल शर्माचा पहिला “चित्रपट किस किस को प्यार करू” मध्ये अभिनेत्री सिमरन कौर मुंडी हिने त्याच्या पत्नीची भूमिका साकरली होती. ऑनस्क्रीन कपिल शर्माची पत्नी म्हणून राहिलेली अभिनेत्री सिमरन कौर मुंडी तिचा प्रियकर गुरीक मानसोबत नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. पटियालामध्ये त्यांचा हा लग्नसमारंभ पार पडला. तिचा पती गुरीक मान हा प्रसिद्ध पंजाबी गायक गुरदास मान यांचा मुलगा आहे.

- Advertisement -

गुरीक आणि सिमरन बऱ्याच वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. अखेर ३१ जानेवारीला दोघे लग्नबंधनात अडकले.
या लग्नात विकी कौशल, सोनाली सहगल, बादशाह, गुरू, पंजाबी सुपस्टार एमी विर्क आणि हर्षद कौर यांसारखे अनेक बॉलिवूड आणि पंजाबी सिनेइंडस्ट्रीतल्या कलाकारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. तसेच कपिल शर्माही लग्नाला उपस्थित होता. एवढंच नाही तर कपिल शर्माने पार्टीत गुरूदास मान यांच्यासोबत गाण्यावर ताल धरत भन्नाट डान्स सुद्धा केला. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

- Advertisement -

या लग्नातला एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा सिमरनला लग्नाच्या शुभेच्छा देतोय तर एकीकडे गुरिकला लग्नावरून चिडवताना दिसत आहे. यामध्येही कपिलचा खोडकर अंदाज समोर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -