घरताज्या घडामोडीVideo : तैमूरला आला पप्पाचा राग; मीडियासमोर उचलला सैफवर हात, पाहा व्हिडीओ

Video : तैमूरला आला पप्पाचा राग; मीडियासमोर उचलला सैफवर हात, पाहा व्हिडीओ

Subscribe

तैमूर काहीतरी हट्ट करत असतो मात्र सैफ त्याचा हट्ट पुरवण्यास नकार देत असल्याचे व्हिडीओतून कळत आहे. त्यामुळे लेकाने हात उचलल्यानंतरही सैफने त्यावर हसत प्रतिक्रिया दिलीय.

मुंबई : बॉलिवूड स्टार किड्स मधील एक नाव सतत लाइम लाइटमध्ये असतं ते म्हणजे सैफ अली खान आणि करिना कपूरचा मुलगा तैमूर अली खान. तैमूर जन्माला आल्यापासूनच तो सातत्याने कोणत्या ना कोणत्या विषयावरुन चर्चेत राहिला आहे. छोटे नवाब तैमूर अली खान हा सोशल मीडिया सेंसेशन बनला आहे. तैमूरचे क्यूट फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. नुकताच तैमूरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात तो नुसती मस्तीच नाही तर थेट पप्पा सैफ अली खानवर हात उचलताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तैमूर पप्पा सैफवर फार नाराज आहे. मीडियासमोर गाडीतून उतरत असताना तैमूर सैफसोबत फार नाटक करताना दिसतोय. तैमूर सैफवर भडकतो आणि गाडीतून खाली उतरतो आणि सैफवर हात उचलतो. तैमूर काहीतरी हट्ट करत असतो मात्र सैफ त्याचा हट्ट पुरवण्यास नकार देत असल्याचे व्हिडीओतून कळत आहे. त्यामुळे लेकाने हात उचलल्यानंतरही सैफने त्यावर हसत प्रतिक्रिया दिलीय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

तैमूर आणि सैफचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी मात्र सैफला चांगलेच ट्रोल केले आहे. ‘अमिर बाप बिगडा हुआ लडका’ म्हणत नेटकऱ्यांनी तैमूरला ट्रोल केले आहे. ‘सैफ करिनाने लेकाचे जरा जास्तच लाड केलेत’, असे देखील अनेकांनी म्हटले आहे. तर काही युझर्सनी तैमूरची बाजू घेत ‘तो अजून लहान आहेत आणि लहान मुले असे वागतात’. तर दुसऱ्या युझरने म्हटलेय ‘आज काल तैमूर ९० टक्के रागातच असतो, करिना मारते वाटते त्याला घरी’. तर काही युझर्सनी तैमूरच्या या व्हिडीओला ‘क्यूट तैमूर’ अशा कमेंट्स केल्या आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा – Anupam Kher यांचं ६९ व्या वर्षी थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात है

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -