घरमनोरंजनकरिष्मा कपूर आता करणार वेबसिरीज

करिष्मा कपूर आता करणार वेबसिरीज

Subscribe

करिष्मा कपूर लवकरच वेबसिरीजमध्ये येणार असल्याची सध्या चर्चा आहे. या प्रोजेक्टसाठी करिष्माच्या डेट्स फायनल करण्यात आल्या असून करिष्माला कथादेखील आवडलं असल्याचं म्हटलं जात आहे.

सध्या वेबसिरीजची चलती आहे. डिजीटल प्लॅटफॉर्म सध्या खूपच वाढत चालला असून तरूण पिढीमध्ये याची क्रेझ आहे. त्यामुळं बॉलीवूडमधील सर्व स्टार्स, निर्मातेदेखील सध्या वेबसिरीजच्या प्लॅटफॉर्मकडे वळत आहेत. करण जोहर, अनुराग कश्यप, इम्तियाज अली असे दिग्गज दिग्दर्शक आणि सैफ अली खान, राधिका आपटे, कियारा अडवाणी, विकी कौशल, नवाजुद्दीन सिद्दीकी अशा बऱ्याच कलाकारांनीदेखील आता डिजीटल प्लॅटफॉर्म स्वीकारला असून काम करायला सुरुवात केली आहे. यामध्ये आता अजून एक नाव जोडलं जाण्याची शक्यता आहे, ते म्हणजे अभिनेत्री करिष्मा कपूरचं. करिष्मा कपूर लवकरच वेबसिरीजमध्ये येणार असल्याची सध्या चर्चा आहे.

चांगली स्क्रिप्ट मिळाल्यास काम करणार

काही दिवसांपूर्वी करिष्माला विचारण्यात आलं असता आपण आईच्या भूमिकेतच सध्या आनंदी असल्याचं तिनं सांगितलं होतं. पण तिनं अभिनय करणं कधीच सोडलं नाही. छोट्या मोठ्या जाहिरातीमधूनदेखील ती काम करताना दिसते. मात्र चित्रपटाची चांगली स्क्रिप्ट न मिळाल्यास, काम करणार नाही असंही करिष्माचं मत आहे. पण आता कदाचित तिला चांगली स्क्रिप्ट मिळाली असून एकता कपूरच्या अल्ट बालाजीबरोबर करिष्मानं हातमिळवणी केल्याचं वृत्त इंग्रजी वृत्तपत्र ‘डीएनए’नं सांगितलं आहे. या प्रोजेक्टसाठी करिष्माच्या डेट्स फायनल करण्यात आल्या असून करिष्माला कथादेखील आवडलं असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा अद्यापही करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

करिष्मा नेहमीच सोशली अॅक्टिव्ह

करिष्मा कपूरचा २०१२ मध्ये ‘डेंजरस इश्क’ नावाचा चित्रपट आला होता. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसलेले नाही. तिचा हा कमबॅक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता. मात्र करिष्मा नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर अॅक्टिव्ह दिसते. ती सतत आपले फोटो पोस्ट करत असते. या प्रोजेक्टसंदर्भात करिष्माकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -