करण जोहरसोबत झालेल्या वादावर कार्तिक आर्यनने केला खुलासा, म्हणाला…

करण आणि त्याच्यात झालेल्या वादाचा त्याच्या कुटुंबावर परिणाम झाल्याचे त्याने सांगितले.

Karthik Aryan reveals controversy with Karan Johar its affected my family
करण जोहरसोबत झालेल्या वादावर कार्तिक आर्यनने केला खुलासा, म्हणाला...

निर्माता करण जोहर आणि धर्मा प्रोडक्शनने अभिनेता कार्तिक आर्यनला दोस्ताना २ सिनेमातून अचानक काढून टाकल्यानंतर कार्तिक आणि करण मध्ये वाद झाले होते. त्याच्या या वादानंतर कार्तिक आर्यनला मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. मात्र करण किंवा कार्तिक दोघांनी ही या विषयावर कोणताही प्रतिक्रिया दिली नव्हती. शेवटी कार्तिक आर्यनने करण जोहर आणि त्याच्यात झालेल्या वादाचा खुलासा केला आहे.

कार्तिकने आरजे सिद्धार्थला दिलेल्या एका मुलाखतीत करण आणि त्याच्यात झालेल्या वादाचा त्याच्या कुटुंबावर परिणाम झाल्याचे त्याने सांगितले. सिद्धार्थने म्हटले, मी अनेकदा स्वत:ला विचारतो की असे का होत आहे. मी स्वत:पेक्षा जास्त माझ्या कुटुंबाचा विचार करतो. कारण त्यांच्या या इंडस्ट्रीशी संबंध नाही पण माझा या इंडस्ट्रीशी संबंध आहे. आपण जोवर आपल्या कामावर फोकस करत नाही तेव्हा तुमच्यासाठी कोणत्याच गोष्टी महत्त्वाच्या नसतात. करण जोहरसोबत झालेल्या वादाचा माझ्या कुटुंबावर मोठा परिणाम झाला. माझ्या कुटुंबापर्यंत काही येऊ नये याचीच मला चिंता असते. बाकी इतर कोणत्याही गोष्टींचा मला फरक पडत नाही. मला माहिती आहे माझे काम बोलते. मी स्वत:मध्ये आणखी सुधारणा करु इच्छितो.

कार्तिक पुढे म्हणाला, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन मी सिनेमा स्विकारला होता. मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. कामाबाबतीत मी कधीही तडजोड करत नाही. माझ्याकडे दुसरा पर्याय असता तर मी तो नक्कीच निवडला असता.

मीडिया रिपोर्टनुसार, कार्तिकला त्याच्या अनप्रोफेशनल वागण्यामुळे सिनेमातून बाहेर काढण्यात आले होते. त्याचप्रमाणे कार्तिक अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत देखील रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटले गेले होते. दोघांच्या ब्रेक अप नंतर दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. सिनेमात जान्हवीला काढण्यासाठी सांगितले होते परंतु करण जोहरने कार्तिकला सिनेमातून बाहेर पडण्यास भाग पाडले.


हेही वाचा – मेगास्टार Mike Tysonने घेतला अनन्या पांडेच्या गालाचा चावा,पहा फोटो