घरताज्या घडामोडीभारतीयांचा लोकप्रिय पासवर्ड कोणता? वाचून व्हाल हैराण

भारतीयांचा लोकप्रिय पासवर्ड कोणता? वाचून व्हाल हैराण

Subscribe

आपल्या आयुष्यात पासवर्ड ही गोष्टी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे अनेक जण पासवर्ड लक्षात राहण्यासाठी सोप्पा पासवर्ड तयार करून ठेवतात. पण अनेक वेळा सोप्पा पासवर्ड ठेवणे खूप महागात पडते. त्यामुळे आयुष्यात एक मजबूत पासवर्ड असणे खूप महत्त्वाचे आहे. दरम्यान भारतात कोणता पासवर्ड लोकप्रिय आहे हे समोर आले आहे. NordPassच्या रिसर्चनुसार भारतात लोकं कोणत्या प्रकारच्या पासवर्डचा सर्वात जास्त वापर करतात हे समोर आले आहे.

भारतात सर्वात जास्त लोकप्रिय पासवर्ड Passwordचं आहे. फक्त भारतातचं नाही तर जपानमध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा पासवर्ड Passwordचं आहे. भारतात याव्यतिरिक्त बरेच कॉमन पासवर्ड्स वापरले जातात. ज्यामध्ये iloveyou,krishna,sairam आणि omsairam याचा समावेश आहे.

- Advertisement -

पासवर्ड मॅनेजर NordPassच्या रिसर्चनुसार, 12345 आणि QWERTY पासवर्ड लिस्टमध्ये टॉपर आहे. हे फक्त भारतात नाही तर जगभरात लोकप्रिय आहे. भारतात लोकं नाव आणि प्रेमळ शब्द पासवर्ड म्हणून खूप ठेवतात. भारतात सर्वात वापरल्या जाणाऱ्या पासवर्डमध्ये 123456789,12345678, india123,qwerty,abc123,xxx,indya123,1qaz@WSX,123123,abcd1234 आणि 1qaz यांचा समावेश आहे.

दरम्यान भारत त्या देशांमध्ये सामील आहे, जिथे सर्वात जास्त लोकप्रिय पासवर्ड Passwordचं आहे. ५० पैकी ४३ देशांमध्ये टॉप पासवर्ड लिस्टमध्ये 123456 हा पासवर्ड आहे. भारतात Qwerty पासवर्ड खूप लोकप्रिय आहे.

- Advertisement -

NordPassच्या माहितीनुसार, भारतात लोकं एकमेकांचे नाव पासवर्ड म्हणून ठेवतात. तसेच Sweetheart,lovely,Sunshine आणि iloveyou यासारखे पासवर्ड भारतात अधिक लोकप्रिय आहे. पण या रिसर्चमधून जे लोकप्रिय पासवर्ड समोर आले आहेत, ते कमकुवत पासवर्ड आहेत. यामुळे हॅकर्स सहजपणे अकाऊंट हॅक करू शकतात. एवढेच नाहीतर ओळखीतला व्यक्ती सहजरित्या अकाऊंट ओपन करू शकतो. त्यामुळे मजबूत पासवर्ड ठेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा – कॉल-ड्रॉप समस्येतून मुक्ती हवेय? लवकर करा iphone अपडेट


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -