कतरिना कैफचा ‘फोन भूत’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘फोन भूत’मुळे चर्चेत आहे. ‘फोन भूत’ चित्रपटाआधी कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीच्या ‘भूल भुलैया 2’ चित्रपट सुद्धा याचं पद्धतीचा हॉरर-कॉमेडी चित्रपट होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींची कमाई केली होती. आता कतरिना कैफचा ‘फोम भूत’ चित्रपटाबाबत निर्मात्यांना अनेक अपेक्षा आहेत. दरम्यान, आता फोनभूतच्या पहिल्या लूकनंतर, एक्सेल एंटरटेनमेंटने आता चित्रपटाचे नवीन मोशन पोस्टर प्रदर्शित केले असून या मोशन पोस्टरमध्ये कतरिना कैफ, इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी चित्रपटाच्या इनसाइट वर्ल्डची झलक दाखवत आहेत.

कतरिना, ईशान आणि सिद्धांत हे मैत्रीपूर्ण त्रिकूट फोनभुतद्वारे सिनेप्रेमींचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहे. नुकतेच समोर आलेले त्याचे नवीनतम मोशन पोस्टर केवळ विचित्रच नाही तर प्रत्येक प्रकारे अद्वितीय आहे, जे आपल्याला चित्रपटाच्या कथेबद्दल सांगते. नेहमीप्रमाणे यात कतरिना कैफ फ्रेश दिसत आहे, तर सिद्धांत आणि ईशानचा लूकही खूपच आकर्षक आहे.

या आगामी साहसी कॉमेडीचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले आहे. हा चित्रपट ७ ओक्टोंबर २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून. या चित्रपटाची रिलीज डेट समोर येताच चाहते खूप खूश झालेले आहेत.


हेही वाचा :‘इमरजेंसी’चं टीझर पाहून अनुपम खेर यांनी केलं कंगनाचं कौतुक