घरमनोरंजन'लॉकडाऊन लग्न'निर्मितीसाठी एक पाऊल पुढे,बॅकस्टेज,नवकलाकारांनाही संधी!

‘लॉकडाऊन लग्न’निर्मितीसाठी एक पाऊल पुढे,बॅकस्टेज,नवकलाकारांनाही संधी!

Subscribe

स्वप्नाना उराशी बाळगून त्यांनी निर्मिती क्षेत्रातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

व्यवसायिक क्षेत्रात आपले नाव उंचावर घेऊन जाणारे निर्माते किरण कुमावत यांनी ‘डॉक्टर डॉक्टर’ चित्रपटाच्या निर्मितीतून सिनेसृष्टीत पाऊल टाकले. लहानवयापासून चित्रपटसृष्टीत आपले नाव असावे वा आपण काम करावे अशी प्रबळ इच्छा मनाशी बाळगून त्यांनी सिनेसृष्टीची स्वप्ने रंगविली. या स्वप्नाना उराशी बाळगून त्यांनी निर्मिती क्षेत्रातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अभिनय क्षेत्रात आपणही सहकलाकाराची भूमिका साकारावी असे किरण कुमावत याना वाटत होते अशी संधी एखाद्या चित्रपटात मिळाल्यास ते या संधीचे नक्कीच सोने करतील. निर्मिती क्षेत्रात एका यशस्वी चित्रपटाच्या निर्मितीनंतर त्यांच्या मनात गोडी निर्माण होत गेली आणि त्यांनी ‘लॉकडाऊन लग्न’ या दुसऱ्या चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरविले. ‘लॉकडाऊन लग्न’ या चित्रपटाचा विषय हाताळण्याचे कारण म्हणजे सध्याच्या महागाईत थाटामाटात लग्न न करता साधेपणाने महागाईचा आणि परिस्थितीचा विचार करता लग्नसोहळा उरकून घेणे, हा मुद्दा पटल्याने त्यांनी चित्रपटाच्या निर्मितीस होकार दिला.

नवकलाकारांना, बॅकस्टेज काम करणाऱ्या नवीन लोकांना संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी एक मार्ग मोकळा करून देणे हा एकमेव उद्देश हाताशी धरून त्यांनी दोन्ही चित्रपटांची केली. निर्माता म्हणून सिनेसृष्टीत येण्यासाठी आयुष्यात काही तरी मोठे ध्येय प्राप्त करून दाखविण्याची इच्छा त्यांना प्रेरणा देत होती, ध्येयापर्यंत पोहोचण्यामध्ये अनेक खाचखळगे त्यांना पार करावे लागले, दरम्यान त्यांना अनेक माणसांचे सहकार्य लागले. निर्माता सागर पाठक आणि सहजोडीला अभिनेता, निर्माता अमोल कागणे यांच्या मदतीने त्यांनी चित्रपटसृष्टीत आपली कमान उभी केली. याशिवाय आई वडिलांच्या आशीर्वादामुळे त्यांनी दोन्ही क्षेत्रात करिअरची सुरुवात करून यश मिळविले. व्यावसायिक क्षेत्रात दबदबा असणारे किरण कुमावत यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपले योगदान देत यशाच्या दिशेने पावले टाकली आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल यांत शंकाच नाही. कारण नवीन लोकांना संधी देणे हा एकमवे उद्देश ठेवून त्यांनी चित्रपटाच्या निर्मितीसाठी हात घातला आहे. त्यांची ही विचार करण्याची पद्धत नवीन कलाकारांची, बॅकस्टेज काम करणाऱ्या सर्व लोकांच्या आयुष्याचा प्रश्न मार्गी लावेल. त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी अशा निर्मात्यांची सिनेसृष्टीला गरजच आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – तू सौभाग्यवती हो : ऐश्वर्या आणि सूर्यभान यांची लगीनघाई

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -