घरमनोरंजनविराटच्या 'त्या' पोस्टरचे हे आहे गुपीत

विराटच्या ‘त्या’ पोस्टरचे हे आहे गुपीत

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या वेगळ्याच अवतारात दिसत आहे. क्रिकेटच्या जर्सी व्यतिरीक्त त्याने अॅक्शनपटाचा वेश परिधान केला आहे. त्याच्या या लुकची सोशल मीडियवर खुपच चर्चा होत आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट कोहलीने त्याच्या ट्विटर आणि इंस्टाग्रामवर एक पोस्टर शेअर केला असून यामध्ये त्याने नवीन फिल्डमध्ये पदार्पण करत असल्याचे म्हटले आहे. अॅक्शन अवतारातील विराटच्या पोस्टरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत असून हे विराटच्या चित्रपटातील पदार्पणाचे पोस्टर आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

View this post on Instagram

 

Another debut after 10 years, can’t wait! ? #TrailerTheMovie www.trailerthemovie.com

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

 पोस्टरवर रिलीज डेट दिली

विराट कोहलीने Trailer The Movie नावाचे पोस्टर त्याच्या इंस्टावर शेअर केले असून यामध्ये तो दोनही हात पसरवून चालताना दिसत आहे आणि त्याच्या मागे गाड्यांची आपापसात टक्कर होताना दिसत आहे. त्यातून एक आगीची ठिणगीही निघालेली पाहायला मिळत आहे. पोस्टरसोबत विराटने लिहिले आहे की, आणखी एक पदार्पण १० वर्षानंतर, वाट बघतोय. या पोस्टरवर रिलीजची तारीख २८ सप्टेंबर २०१९ देखील दिली आहे. आता हा ट्रेलर आहे का चित्रपट याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

- Advertisement -

कपड्यांच्या ब्रँडिंगसाठी केली जाहीरात

विराटने हे पोस्टर त्याच्या कोणत्या चित्रपटासाठी नाही तर एका बँडसाठी केले आहे. विराट wrogn.in या नावाच्या कपड्यांच्या ब्रँडींगची सुरूवात करत असून त्यासाठीचे पोस्टर बनवण्यात आले आहे. या माध्यमातून आता विराट वेबसाइटवरून कपड्यांची विक्री करणार आहे. या वेबसाइटचे लाँचिंग २८ तारखेला होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -