घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाकुडाळकर यांचा मूषकाच्या रथात विराजमान झालेला बाप्पा

कुडाळकर यांचा मूषकाच्या रथात विराजमान झालेला बाप्पा

Subscribe

सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यात राहणाऱ्या मिनल कुडाळकर यांनी नदीच्या मातीपासून स्वतःच बाप्पाची सुंदर मूर्ती साकारली आहे. गेल्या १९ वर्षांपासून ते हाताने बनवलेली मूर्तीची पूजा करत आहेत. ते पाच दिवसांचा गौरी – गणपती सण साजरा करतात. यावेळी देखावा म्हणून मुषकाच्या रथात विराजमान झालेला बाप्पा अशी संकल्पना वापरून छान अशी सजावट केलेली आहे. मूर्ती बनवण्यासाठी नदीची माती, काड्या, कापूस, चुन्या, डोळ्यांसाठी गुंजाच्या बिया आणि इतर सजावटीसाठी झाडांची पाने, फुले वापरण्यात आली आहेत.
ज्या दैवताला आपण मनोभावे पुजतो त्याची विसर्जनानंतरची अवस्था बघवत नाही, या भावनेतून कुडाळकर यांनी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.

जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा कान्टेस्ट बद्दल

- Advertisement -

माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करू शकता.


तुम्हाला हे माहिती आहे का? – गणेशोत्सव काळात कोकणवासीयांसाठी केलेली टोलमाफी फसवी?

- Advertisement -

तसेच लालबागच्या राजाचे थेट लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे मुखदर्शन ते विसर्जन असे सर्व दहा दिवस माय महानगर वेबसाईटवर लालबागच्या राजाला तुम्ही पाहू शकता. याशिवाय गणेशोत्सवासंबंधीची प्रत्येक अपडेट, सार्वजनिक मंडळाचे उपक्रम, इको फ्रेंडली गणपती आणि उत्सवाशी निगडीत सर्व बातम्या मिळतील एका क्लिकवर…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -