घरमनोरंजन'स्त्री' चित्रपटातील 'आओ हवेली पे' मध्ये क्रिती सनॉन वेगळ्या अंदाजात

‘स्त्री’ चित्रपटातील ‘आओ हवेली पे’ मध्ये क्रिती सनॉन वेगळ्या अंदाजात

Subscribe

राजकुमारच्या येणाऱ्या 'स्त्री' चित्रपटातील नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं असून 'आओ हवेली पे' या गाण्यामध्ये पहिल्यांदाच क्रिती सनॉन आयटम साँग करत आहे.

राजकुमार राव आणि क्रिती सनॉन ही जोडी पहिल्यांदाच ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटामध्ये दिसली होती आणि सर्वच प्रेक्षकांना जोडी आवडली होती. आता राजकुमारच्या येणाऱ्या ‘स्त्री’ चित्रपटातील नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. यामध्ये राजकुमारबरोबर श्रद्धा कपूर दिसणार आहे. मात्र या गाण्यामध्ये क्रितीबरोबर राजकुमार राव दिसत आहे. ‘स्त्री’ च्या या नव्या गाण्यामध्ये रॅपर बादशाह रॅप करताना दिसत आहे. ‘आओ कभी हवेली पे’ हा अगदी जबरदस्त प्रसिद्ध संवाद आहे, याच संवादाचा या गाण्यामध्ये उपयोग करण्यात आला आहे. हे गाणं आयटम नंबर असून क्रिती सनॉन पहिल्यांदाच आयटम नंबर करत आहे.

कसं आहे हे गाणं?

या गाण्याचा व्हिडिओ अतिशय मजेदार आहे. यामध्ये एखाद्या माणसाची निवड करायची सोडून क्रिती सनॉन हाडाच्या सापळ्याची निवड करते. तर ती याच सापळ्यासह डेटवर जातानाही दिसत आहे. या गाण्याच्या पुढच्या भागामध्ये राजकुमार राव एका भूताच्या अंदाजामध्ये दिसत आहे. ‘स्त्री’ हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे आणि या गाण्यामधून त्याचा अंदाज प्रेक्षकांना लावता येईल. या गाण्याला सचिन – जिगर या जोडीनं संगीत दिलं असून बादशाह, निकिती गांधी आणि सचिन – जिगरनं हे गाणं गायलं आहे.

- Advertisement -

श्रद्धा आणि राजकुमार सध्या व्यस्त

‘स्त्री’ व्यतिरिक्त श्रद्धा सध्या सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये काम करत आहे. तर, शाहिद कपूरबरोबर ‘बत्ती गुल मीटर चालू’च्या चित्रीकरणातही ती सध्या व्यस्त आहे. याशिवाय ‘बाहुबली’ स्टार प्रभासबरोबर ‘साहो’ चित्रपटातही श्रद्धा दिसणार आहे. तर राजकुमार राव ‘मेंटल है क्या’ आणि ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -