घरमनोरंजन'बिग बॉस'मध्ये होऊ दे चर्चा

‘बिग बॉस’मध्ये होऊ दे चर्चा

Subscribe

आज बिग बॉस घरातील सदस्यांना जरा हटके असे “होऊ दे चर्चा” हे कार्य आजच्या भागात बिग बॉस सोपवणार आहेत. काय असेल हे कार्य ? प्रेक्षकांना आजच्या भागात पाहायला मिळेल.

आपल्या जगावेगळ्या कृत्याची बातमी झाली की एका रात्रीत खऱ्या अर्थानं नशीब बदलत असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. यात काहीजण खरचं काहीतरी जगावेगळं करतात तर काहीजण पब्लिसिटी स्टंट म्हणून अतरंगी काहीतरी करतात. याच सगळ्याची ब्रेकिंग न्यूज बनते आणि सदर व्यक्ती प्रसिद्धी मिळवते. अशीच प्रकारची जगावेगळी कृत्य करून घरातील सदस्यांना बातम्यांमध्ये यायचे आहे. त्यामुळेच आज बिग बॉस घरातील सदस्यांना जरा हटके असे “होऊ दे चर्चा” हे कार्य आजच्या भागात बिग बॉस सोपवणार आहेत.

नॉमिनेशनचं रंगलं कार्य

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल नॉमिनेशन प्रक्रिया कार्य रंगलं. आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रियेसाठी एक वेगळा टास्क सदस्यांना बिग बॉगकडून देण्यात आलं. या आठवड्यातील नॉमिनेशन कार्य जोड्यांमध्ये पार पडलं. या कार्यानिमित्त घरामध्ये चार जोड्या बनवण्यात आल्या. प्रत्येक जोडीला एक कंटेनर देण्यात आले, त्या कंटेनरमध्ये वाळू भरलेली होती. नॉमिनेशन प्रक्रियेमधून सुरक्षित होण्यासाठी सर्व जोड्यांना इतर जोड्यांच्या कंटेनरमधील वाळू कमी करायची होती तसेच आपल्या कंटेनरमधील वाळू कमी होणार नाही याची दक्षता घ्यायची होती. या कार्यामध्ये आणि या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेमधून रेशम घराची कॅप्टन असल्या कारणाने तसेच नंदकिशोर हा हुकूमशाहा टास्क उत्तमरीत्या केल्यामुळे सुरक्षित आहेत. रेशम कालच्या टास्क मध्ये संचालकाच्या भूमिकेत होती. या टास्क मध्ये पुष्कर आणि मेघा सुरक्षित ठरले आणि बाकीचे सदस्य म्हणजेच आस्ताद, सई, स्मिता, उषा नाडकर्णी आणि शर्मिष्ठा या आठवड्याच्या घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले.

- Advertisement -

आज रंगणार दोन टास्क

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दोन टास्क रंगणार आहेत. सदस्यांना बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येऊन आता ७० दिवस झाले. याच अंदाजाचा आणि कल्पकतेचा आधार घेऊन स्वत:ची क्रमवारी सदस्यांना ठरवायची आहे. सदस्यांच्या चांगल्या कृत्याची बाहेरच्या जगात दखल घेतली गेली असेल किंवा एखाद्या कृत्याची सनसनाटी बातमी झाली असेलच. तर सदस्यांना आज आपल्यापैकी अश्या पाच सदस्यांची क्रमवारी ठरवायची आहे. ज्यावरून मेघा आणि रेशम मध्ये पहिल्या क्रमांकावर तसेच दुसऱ्या क्रमांकावर कोण असेल? यावरून बरेच वाद होणार आहेत. आपणही मागील दोन आठवड्यामध्ये चर्चा निर्माण केली असल्याने पहिल्या पाच क्रमांकामध्ये जागा मिळायला हवी असं नंदकिशोरनं सांगितलं आहे. तेव्हा आता कोणत्या सदस्याला कोणत्या क्रमांकावर उभे करणार? कोणामध्ये वाद होणार? हे बघणं रंजक असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -