घरमनोरंजनसारा अली खान आणि जान्हवी कपूर करणार एकत्र काम; पोस्ट शेअर करत...

सारा अली खान आणि जान्हवी कपूर करणार एकत्र काम; पोस्ट शेअर करत केला खुलासा

Subscribe

बॉलिवूडमधील अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर बॉलिवूडमधील चांगल्या मैत्रिण म्हणून ओळखल्या जातात. दोघींच्या मैत्रीचे किस्से नेहमीच चर्चेत असतात.

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेकदा दिसून येत की, एकावेळी दोन मोठ्या अभिनेत्री कधीही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी नसतात. नेहमीच या अभिनेत्रींमध्ये वाद-विवाद असल्याच्या बातम्या समोर येत असतात. परंतु बॉलिवूडमधील अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर बॉलिवूडमधील चांगल्या मैत्रिण म्हणून ओळखल्या जातात. दोघींच्या मैत्रीचे किस्से नेहमीच चर्चेत असतात. मागील काही दिवसांपूर्वी या दोघी करण जौहरच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये देखील आल्या होत्या. दरम्यान, आता या दोघीसुद्धा एकत्र काम करताना दिसून येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सारा आणि जान्हवी करणार एकत्र काम

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

- Advertisement -

अभिनेत्रा सारा अली खान आणि अभिनेत्री जान्हवी कपूरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दोघींचा एक नवीन फोटो शेअर केला आहे. तसेच हा फोटो शेअर करत साराने लिहिलंय की, गरम कॉफी एकत्र पिल्यानंतर आता सहकलाकाराच्या रूपामध्ये एकत्र शूट करत आहोत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

तर, जान्हवीने फोटो शेअर करत खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, सहप्रवासी..कॉफी डेट आणि आता सहकलाकार

- Advertisement -

‘कॉफी विद करण’मध्ये दिसल्या होत्या एकत्र
नुकत्याच काही दिवसांपूर्वी सारा आणि जान्हवी करण जौहरच्या कॉफी विद करण ७ मध्ये दिसून आल्या होत्या. यावेळी त्यांच्या खासगी आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले. तसेच त्यांच्या केदारनाथ ट्रिपमधील किस्से देखील शेअर केले. दोघीही लहानपणापासूनच्या चांगल्या मैत्रिणी आहेत.

 

हेही वाचा :धर्मवीर आनंद दिघेंच्या दहीहंडीत श्रद्धा कपूरची हजेरी; मराठमोळ्या अंदाजात म्हणाली..

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -