नेहा कक्करच्या आवाजातील ‘मैने पायल है छनकाई’ गाण्यावर प्रेक्षक संतापले

या गाण्यामधील नेहाच्या आवाजाला लोक ट्रोल करू लागले आहेत. तसेच ते 90 च्या दशकातील फाल्गुनी पाठक 'मैने पायल है छनकाई' यांच्या सुंदर आवाजातील गाणं नेहा कक्करने रिक्रिएट करून खराब केलं आहे.

सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर तिच्या सुंदर आवाज आणि मनमोहक गाण्यांमुळे ओळखली जाते. नेहा कक्करच्या आवाजाचे अनेक चाहते आहेत. नेहा वारंवार तिच्या नवनवीन गाण्यांमुळे चर्चेत असते. तसेच नेहा सोशल मीडियावरही खूप चर्चेत असते. परंतु, सध्या नेहा कक्कर सोशल मीडिया आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी नेहाने गायिका फाल्गुनी पाठक यांचं 90 च्या दशकातील सुप्रसिद्ध गाणं ‘मैने पायल है छनकाई’ गाणं आपल्या आवाजात रिक्रिएट केलं आहे.

काही जणांना हे गाणं खूप आवडलं आहे तर काही जणांनी या गाण्यामुळे नेहाला ट्रोल केलं आहे. या गाण्यामधील नेहाच्या आवाजाला लोक ट्रोल करू लागले आहेत. तसेच ते 90 च्या दशकातील फाल्गुनी पाठक ‘मैने पायल है छनकाई’ यांच्या सुंदर आवाजातील गाणं नेहा कक्करने रिक्रिएट करून खराब केलं आहे. त्यामुळे युजर्स नेहाला खूप ट्रोल करू लागले आहेत.

नुकतचं नेहा कक्करच्या या गाण्याला टी-सीरीजने त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केलं आहे. जे ऐकल्यानंतर अनेकजण तिला ट्रोल करू लागले आहेत. त्यांपैकी एका युजरने तर नेहावर त्याच्या लहानपणीच्या आवडत्या गाण्याला संपवण्याचा आरोप केला आहे. तर दुसऱ्याने रिक्रिएट गाण्याबाबत कमेंट केली की, मी गाण्यांचे रिमेक बनवणाऱ्यांच्या विरोधी आहे, जर श्रेया घोषालच्या आवाजामध्ये जसं एक दोन तीन गाण्याचं रिमेक बनवण्यात आलं. मात्र नेहा कक्करच्या आवाजातील या गाण्याने कानाचे पर्दे फाडत आहेत.

दरम्यान, या रिक्रिएट करण्यात आलेल्या या गाण्यामध्ये नेहा स्वतः परफॉर्म करताना दिसत आहे. सोबतच बिग बॉस फेम प्रियांक आणि धनश्री वर्मा सुद्धा दिसून येत आहेत. हे गाणं नेहाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट देखील केलं आहे.


हेही वाचा :

अरुण गोविल आणि दीपिका पुन्हा एकदा राम-सीतेच्या भूमिकेत