Thursday, March 4, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन कंगणाने दाखवली पाठ पण उर्मिला आणि मुंबई पोलिसांनी दिला हात- मालवी मल्होत्रा

कंगणाने दाखवली पाठ पण उर्मिला आणि मुंबई पोलिसांनी दिला हात- मालवी मल्होत्रा

'गीशा' या हिंदी वेबसिरिजच्या लाँचिंग सोहळ्यादरम्यान माय महानगरसमोर मालवीने व्यक्त केल्या भावना

Related Story

- Advertisement -

वादग्रस्त ट्वीट आणि वक्तव्यांमुळे बॉलिवूड क्वीन कंगना राणौत नेहमी चर्चेत असते. यात आता अभिनेत्री मालवी मल्होत्रानेही कंगनावर आरोप केले आहेत. मदतीच्या वेळीही गाववाली असूनही गरजेच्या वेळी मदत केली नसल्याचा आरोप मालवीने केला आहे. ‘गीशा’ या हिंदी वेबसिरिजच्या लाँचिंग सोहळ्यादरम्यान माय महानगरसमोर मालवीने आपल्या भावना व्यक्त केल्यात. यावेळी बोलताना मालवीने, ‘कंगना व्यक्ती म्हणून जरी चांगली असली तरी मदतीच्या वेळी मात्र ती पाठ फिरवते असेही तिने म्हंटले. परंतु यावेळी तिच्या मदतीला धावून आलेल्या शिवसेना नेत्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर व मुंबई पोलिसांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.(Actress Malvi Malhotra accuses Kangana ranaut)

मालवीवर ऑक्टोबर २०२० मध्ये योगेश कुमार नावाच्या तरुणाने चाकू हल्ला केला होता. योगेशचा लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने त्याने हे कृत्य केले असे मालकीचे म्हणणे आहे. याप्रकरणात माय महानगरशी बोलताना मालवीने सांगितले. ”काही महिन्यांपूर्वी माझ्यावर चाकू हल्ला झाला होता. अनेक महिने मी मृत्यूशी झुंज देत होती. यावेळी कंगनाने मला हॉस्पीटलमध्ये पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले होते. तसे डॉक्टरांच्या मदतीने माझा हॉस्पीटलमधील एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत मदतीचे आवाहन केले. त्यामुळे कंगना मला पूर्ण मदत करले असा विश्वास होता. पण ज्यावेळी मला हॉस्पीटलमधून डिस्चार्ज मिळाला तेव्हा मी कंगनाच्या मदतीची वाट पाहत होती. पण मदत काही आली नाही. ना कंगनाने माझी चौकशी केली ना ही तिच्या टीमकडून माझी चौकशी झाली.

- Advertisement -

यावर पुढे बोलताना मालवी सांगते की, ‘कंगनाने खऱ्या मदतीच्या वेळी काढता पाय घेतला. कंगना माझ्या गावतील एक मुलगी आहे. त्यामुळे गावातील व्यक्ती म्हणून तरी कंगनाने माणुसकी दाखवत मदत करणे गरजेचे होते परंतु तसेच झाले नाही. माणुसकीच्या नात्याने तरी दिलेला शब्द कंगनाने पाळणे अपेक्षित होते. कंगनाने तिच्या वागण्यातून दाखवून दिले की, ती कोणच्याही मदतीला कधी उपयोगी पडू शकत नाही. याचदरम्यान शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि मुंबई पोलिसांनी खूप मदत केली. त्यामुळे मी उर्मिलाजींचे आणि मुंबई पोलिसांचे खूप खूप आभार मानते. तसेच उर्मिलाजींनी व मुंबई पोलिसांनी मला मुंबईत मी खूप सुरक्षित असल्याचा विश्वास दिला आहे. असे मालवी म्हणाली.

 

- Advertisement -