घरमहाराष्ट्रआरोग्य विज्ञापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदी डॉ. करमळकर

आरोग्य विज्ञापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदी डॉ. करमळकर

Subscribe

मावळते कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विद्यापीठाचा मानदंड सोपवला डॉ. करमळकर यांच्याकडे

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदी सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांची नियुक्ती झाली आहे. मावळते कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विद्यापीठाचा मानदंड डॉ. करमळकर यांच्याकडे सुपूर्द करत गुरुवारी (दि.11) विद्यापीठाचा कार्यभार सोपवला.

डॉ.करमळकर यांना उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापन, प्रशासन, तसेच संशोधनाचा मोठा अनुभव आहे. पर्यावरण, भूगर्भशास्त्र, भूरसायनशास्त्र हे त्याचे संशोधनाचे विषय. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमधून त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. तसेच, परदेशातील काही संस्थांबरोबर सध्या संशोधन प्रकल्प सुरू आहेत. पाषाण हा त्यांचा अभ्यासाचा विषय असून, विविध प्रकारच्या अधिवासात आढळणार्‍या पाषाणांवर त्यांचे संशोधन सुरू आहे. याप्रसंगी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी एन.व्ही. कळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक आदी उपस्थित होते.

आरोग्य विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र असून आरोग्य क्षेत्राशी निगडीत व्यक्तिंसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. कोविड-19 च्या काळात विद्यापीठाने व विविध आरोग्य संस्थांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाबरोबर विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधनाचे कामकाज विद्यापीठातून यापुढे घडावे यासाठी मी प्रयत्नशील राहील.
– डॉ. नितीन करमाळकर, प्र. कुलगुरू, आरोग्य विज्ञान विद्यापीठ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -