घरमनोरंजनमंदिरा बेदीने वाईन हातात घेऊन दिल्या करवा चौथच्या शुभेच्छा; आता होतेय ट्रोल

मंदिरा बेदीने वाईन हातात घेऊन दिल्या करवा चौथच्या शुभेच्छा; आता होतेय ट्रोल

Subscribe

हा फोटो शेअर केल्याने मंदिरा झाली ट्रोल

करवा चौथ या व्रताच्या दिवशी अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी आपल्या पतीसह फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या अभिनेत्रींमध्ये मंदीरा बेदीने देखील आपल्या पतीसह एक फोटो शेअर करून लोकांना करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, तिच्या चाहत्यांनी तिने शेअर केलेल्या फोटोवर चांगलेच ट्रोल केले असून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हा फोटो शेअर केल्याने मंदिरा झाली ट्रोल

मंदिराने तिच्या इन्स्टाग्रामवर पतीसह काढलेला एक फोटो शेअर केला आहे. करवा चौथच्या संध्याकाळी शेअर केलेल्या या फोटोत मंदिरा साडी आणि लाल टिकली लावल्याचे दिसत आहे. तिने आणि तिच्या पतीने त्यांच्या हातात वाईनचा ग्लास घेऊन करवा चौथच्या शुभेच्या दिल्या आहेत. या फोटोमुळे त्यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे.

View this post on Instagram

Happy #karvachauth ?❤️

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi) on

- Advertisement -

यावर काही नेटकऱ्यांनी चिडून रागात आपल्या संस्कृतीचा तरी विचार करा अशा प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

- Advertisement -

बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटींपैकी शिल्पा शेट्टी आणि रवीना टंडन यांनी यावेळी अनिल कपूरच्या घरी करवा चौथ साजरा केला. शिल्पाने लाल साडी परिधान केली असून तिचा नवरा राजकुंद्रासोबत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहे.

तसेच अनुष्का शर्मा आणि तिचा नवरा विराट कोहली या दोघांनीही करवा चौथचा उपवास एकमेकांसाठी ठेवला असून त्यांनी देखील फोटो शेअर केले.

करवा चौथच्या शुभेच्छा देताना प्रियंका चोप्रानेही एक फोटो शेअर केला असून ज्यामध्ये ती सिंदूर लावलेल्या रूपात दिसत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -