होय, मी घटस्फोटासाठी अर्ज केला… मानसी नाईककडून शिक्कामोर्तब

मराठमोळी अभिनेत्री आणि नृत्यांगणा मानसी नाईक तिच्या अभिनयाने आणि नृत्यांचे सर्वांचेच लक्ष वेधून घेत असते. मानसीला ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ या गाण्यामुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. तेव्हापासून मानसी विविध कारणांमुळे सतत चर्चेत असते. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मानसी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मानसी तिचा पती प्रदीप खरेरा एकमेकांपासून विभक्त होणार आहेत.

19 जानेवारी 2021 रोजी मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचे लग्न झाले होते. लग्नापूर्वी अनेक दिवसांपासून हे दोघेही एकमेकांना डेट करत होते. 2021 मध्ये दोघांनी मुंबईमझ्ये धुमधडाक्यात लग्न केलं. मात्र, आता दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याची चर्चा सुरु झाली आहे. इतकचं नव्हे तर मानसीने मागील काही दिवसांपूर्वी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन प्रदीपसोबतचे सर्व फोटो डिलीट केले आहेत. तसेच तिने अकाऊंटवरुन मानसी खरेरा हे आडनाव देखील काढलं आहे.

मागील काही दिवसांपासून मानसी वेगवेगळ्या पोस्ट देखील करत आहे. ज्यातून तिच्यामध्ये आणि प्रदीमध्ये काहीतरी बिनसल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, आता याबाबत मानसीने स्वतःच खुलासा केला आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना मानसीने सांगितलं की, “घटस्फोटाबद्दल सुरू असलेली चर्चा दुर्दैवाने खरी आहे. मी खोटं बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. पुढील प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे. या क्षणाला मी खूप दुःखी आहे.”

तसेच पुढे ती म्हणाली की, “नक्की झालं आहे हे मी आता सांगू शकत नाही. हे सर्व खूप गडबडीत झालं. माझा प्रेमावर विश्वास आहे. परंतु माझ्या आयुष्यात एक वेळ अशी होती जेव्हा मला कुटुंब हवे होते आणि म्हणूनच मी लग्न केलं. मला त्याच्याबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल खूप आदर आहे. परंतु एक स्त्री म्हणून मला माझा स्वाभिमान महत्वाचा आहे. आता मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्याला आपण नेहमीच साथ देतो. परंतु सगळं एकाच व्यक्तीने करायचं ठरवंल्यास सर्व काही कठीण होऊन बसतं. नात्यामध्ये समजूतदारपणा नसेल तर ती त्यातून वेळीच बाहेर पडायला हवं.” असं मानसी म्हणाली.

 


हेही वाचा :

भारतात आजपासून ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात