घरमनोरंजनभूषण आणि पल्लवीची प्रेमकहाणी

भूषण आणि पल्लवीची प्रेमकहाणी

Subscribe

सध्या सर्वत्र चर्चा रंगलीये ती अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री पल्लवी पाटीलच्या लव्हस्टोरीची. लवकरच हे दोघे एका गाण्याच्या अल्बममधून प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत.

प्रेमात कोण यशस्वी होतं तर कोण अयशस्वी. मात्र काहीही असलं तरी प्रत्येकाची एक लव्हस्टोरी असतेच. अशीच सध्या सर्वत्र चर्चा रंगलीये ती अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री पल्लवी पाटीलच्या लव्हस्टोरीची. लवकरच हे दोघे एका गाण्याच्या अल्बममधून प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. ‘सांग सजणी कवा होईल आपली लव्हस्टोरी सुरू’ असं म्हणत भूषण सध्या पल्लवीच्या प्रेमात आकंठ बुडालेला दिसतोय. भूषण आणि पल्लवीची फुलणारी ही लव्हस्टोरी खऱ्या आयुष्यातील नसून व्हिडिओ पॅलेसची प्रस्तुती असलेल्या आपली ‘Love Story’ या अल्बमच्या एका गाण्यासाठी आहे.

View this post on Instagram

New Song Alert!

A post shared by B H U S H A N P R A D H A N (@bhushan_pradhan) on

- Advertisement -

मराठी कलाविश्वातील हॅण्डसम अभिनेता म्हणून भूषणकडे पाहिले जाते. तर पल्लवी पाटील ही उत्तम अभिनेत्री असल्याचे साऱ्यांनाच ठावूक आहे. ‘पिंजरा’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला भूषण सध्या पल्लवी पाटीलच्या प्रेमात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या ‘LoveStory’ची चांगलीच चर्चा रंगत आहे. सचिन आंबट यांनी हे गाणं लिहले असून गाण्याला रोहित ननावरे आणि विकी अडसुळे यांचे सुमधूर संगीत लाभले आहे. या गाण्याचे छायांकन अमोल गोळे तर संकलन गुरु पाटील, महेश किल्लेकर यांचे आहे. ‘Love Story’ या गाण्यात भूषण आणि पल्लवीचा रोमँटिक अंदाज पहायला मिळतोय. नुकतेच हे गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे.

- Advertisement -

प्रत्येकाला पुन्हा एकदा प्रेमात पडावेसे वाटेल असे हे गाणं करताना खूप मज्जा आली असे भूषण आणि पल्लवीने सांगितले. तसेच व्हिडिओ पॅलेसच्या नानूभाई यांचे चांगल्या गाण्यासाठी आभार मानले आहेत. कलाकारांसोबत गायकांनासुद्धा प्रमोट करणार हे गाणं करायला मिळाल्याचा आनंद ऋषीकेश रानडे आणि कीर्ती किल्लेदार यांनी व्यक्त केला.

हेही वाचा –

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -