घरमनोरंजन'या पर्वात हर्षदची खूप आठवण येईल'

‘या पर्वात हर्षदची खूप आठवण येईल’

Subscribe

सुर नवा ध्यास नवाचे तिसरे पर्व नुकतेच सुरू झाले आहे. या पर्वात ५ ते ५५ वर्ष असा वयोगट ठरवण्यात आला आहे. गेल्या वर्षी झालेले लहान मुलांचे पर्व खूप गाजले. आता हे पर्व कसे असणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. गेल्या वर्षी प्रमाणेच या वर्षीही अभिनेत्री स्पृहा जोशी या पर्वाचे सुत्रसंचालन करणार आहे. यानिमित्ताने स्पृहाने आपलं महानगरशी काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत.

१.
५ ते ५५ वर्ष असा वयोगट असणारे पर्व तुझ्यासाठी टास्क असणार का?
– मी या पर्वासाठी खूप उत्सुक आहे. कारण एका मोठ्या मंचाबरोबर माझं नाव जोडलं गेलं आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास ठेवत माझ्यावर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. ५ ते ५५ वर्ष अशा मोठ्या वयोगटामध्ये पहिल्यांदा अशाप्रकारची स्पर्धा होते. या आधी अशाप्रकारची स्पर्धा कधीच झाली नसल्यामुळे आम्ही सगळेच खूप उत्सुक आहे. आधीच्या पर्वाप्रमाणेच या प्रर्वातही प्रचंड सुंदर गाणी गाणारे स्पर्धक आहेत. त्यामुळे आम्ही थक्क झाले आहोत. की महाराष्ट्रात एवढं टॅलेंट आहे.

२. यावेळी तू सुत्रसंचालनात काही वेगळेपण असणार आहे का?
– मी सूत्रसंचालन करताना नेहमी असा प्रयत्न करते की मुद्दाम वेगळं काही करायचं नाही. कारण तस करायला गेले तर काहीतर गडबड होऊ शकते. त्यामुळे मी नेहमी जशी बोलते त्याचप्रमाणे सुत्रसंचालन करणार आहे. त्याचबरोबर इथल्या स्पर्धकांशी मला मैत्री करायची आहे. जर माझी चांगली मैत्री झाली तरच ते माझ्याशी त्यांच्या गोष्टी शेअर करू शकतील. तरच कार्यक्रमात चांगली रंगत येईल. आमचे लेखक वैभव जोशी यांनी जर मला संधी दिली तर नक्की माझ्या कविता ऐकायला मिळतील. जरी मी माझ्या नाही तरी त्याच्या कविता नक्की मी ऐकवेन

- Advertisement -

३. हर्षद नायबळ शिवाय तुला सेटवर करमेल का?
शुटींगच्या दिवशी सकाळी हर्षदाच्या आवाजानेच दिवसाची सुरूवात व्हायची. स्पृहा ताई अशी हाक मारत तो माझ्यारूममध्ये यायचा आणि आमची धम्माल सुरू व्हायची. ऑनस्टेज आणि ऑफस्टेज आमचं बॉण्डींग खूप चांगलं होतं. या पर्वाला मी सेटवर गेले तेव्हा कुठून तरी हर्षद धावत येईल असं सारखं वाटत होतं. हा सेट त्याच्याशिवय आहे हे मला समजून घ्यायला खूप वेळ लागला. बाकी हर्षद किती हुशार आहे ते सगळ्या प्रेक्षकांना माहित आहे.

४. या पर्वाच्या सुरूवातीलाच स्पर्धकांची हृदयस्पर्शी पार्श्वभूमी समोर आली आहे?
– या पर्वात अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत. आता स्पर्धेत असेलेले स्पर्धक वेगेवगळ्या परिस्थितीतून पुढे आले आहेत. अमोल घोडगे खूप अवघड परिस्थितून इथेपर्यंत पोहचला आहे. आपल्या आजारावर मात करत तो इथपर्यंत पोहचला आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. या गोष्टी फार सुंदर आहेत. त्यामुळे यंदाच पर्व खूप खास ठरणार आहे.

- Advertisement -

५. तुझ्या कवितांवरून प्रेक्षकांच्या निगेटीव्ह प्रतिक्रीयांना काय उत्तर देतेस?
– अनेकदा माझ्या कवितांना खूप संमिश्र प्रतिक्रिया येतात. ‘कविता खूप छान वाटली पण काहीच कळली नाही’, ‘अर्थ समजावून सांग’,पण मला असं वाटतं प्रत्येकाचे कविता समजण्याचे वेगळे प्रमाण असते. एखादी कविता मला जसी कळेल ती दुसऱ्याला कळेलच असे नाही. त्यामुळे तुम्ही कविता सतत वाचत रहा तुम्हाला त्या अपोआप कळतील.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -