Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन Rakshabandhan 2022: मराठी अभिनेत्रींनीसुद्धा रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावंडांसोबतच्या आठवणींना दिला उजाळा

Rakshabandhan 2022: मराठी अभिनेत्रींनीसुद्धा रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावंडांसोबतच्या आठवणींना दिला उजाळा

Subscribe

छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींनीसुद्धा राक्षबंधांच्या त्यांच्या काही खास आठवणींना उजाळा दिला आहे.

रक्षाबंधनाचा प्रत्येक भाऊ – बहिणीसाठी खूप साठी असते. प्रत्येक जण हा दिवस स्पेशल पद्धतीने साजरा करतो. रक्षाबंधनाची आठवण प्रत्येक भाऊ आणि बहिणीसाठी खूपच खास असते. राखी पोर्णिमा हा सण भाऊ बहिणी मधील जिव्हाळा, प्रेम आणि संरक्षणाचे प्रतिक आहे. छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींनीसुद्धा राक्षबंधांच्या त्यांच्या काही खास आठवणींना उजाळा दिला आहे.

हे ही वाचा – Rakshabandhan 2022: बॉलिवूडमधल्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री त्यांच्या बहिणीलाच बांधतात राखी

- Advertisement -

झी मराठीवर(zee marathi) येत असलेल्या नविन मालिकां मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपा परब-चौधरी, पल्लवी पाटील आणि धनश्री कडगावकर यांनी आपल्या भावा बरोबरच्या अतुट नात्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. पल्लवी पाटील “नवा गडी नवं राज्य” मधील आनंदी आपल्या भावा बरोबर असलेल्या प्रेमळ नात्या बद्दल सांगते की,

“मी माझाच भाऊ नाही तर चुलत भावांना देखील तेवढ्याच प्रेमाने राखी बांधते, आम्ही सर्व एकत्र जमलो की धम्माल करतो. लहान असताना आपल्याला कोणीतरी राखी बांधून दादा म्हणाव असे वाटायचे ती इच्छा मग माझ्या बहिणी मला राखी बांधून दादा म्हणुन पुर्ण करायच्या. ही माझी बालपणीची आठवण अजून माझ्या स्मरणात आहे. आम्हा भावंडांच नातं खुप गोड आहे.”

- Advertisement -

अभिनेत्री दिपा परब-चौधरी(deepa parab chaoudhari) ही बऱ्याच कालावधी नंतर “तु चाल पुढं” या नव्या मालिकेतुन आपल्या भेटीला येणार आहे. दिपा आपल्या भावा बद्दल सांगते की आमचे नाते खुप गोड आहे. तो कायम माझ्या पाठीशी उभा राहिला आहे, माझा भाऊ मला नेहमी माझ्या कामासाठी प्रोत्साहन देतो. माझे काम त्याला खूप आवडते. नवीन नवीन गोष्टी तो मला सुचवतो. या वर्षी देखील तेवढ्याच आनंदाने आणि उत्सहाने आम्ही रक्षाबंधन साजरे करणार आहोत असं सांगताना दिपा खुप खुश होती.

हे ही वाचा – कोणताही मंत्री असो त्यांच्या पत्नीला… अमृता फडणवीसांनी दिलं गमतीशीर उत्तर

त्याचबरोबर तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून वाहिनीसाहेब हे खल नायिकेचं पात्र उत्तमपणे रंगवणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर(dhanashri kadgaonkar) ” तु चाल पुढं ” या नविन मालिकेतील” शिल्पी”या भुमिकेत दिसणारी प्रसिद्ध अभिनेत्री धनश्री काडगावकर लहानपणीच्या आठवणी सांगताना म्हणाली की, आम्ही लहानपणी खुप भांडायचो ,भन्नाट मस्ती करायचो पण ते तेवढ्यापुरतच. लहानपणी रक्षाबंधनाला भावाकडे मला देण्यासाठी छानशी भेट वस्तू असायची,पण मला मुद्दाम चिडवण्यासाठी एक रुपया द्यायचा. अशा मधुर आठवणी आहेत. या वर्षी कामात व्यस्त असल्यामुळे भेट होईल की नाही शंका आहे पण आम्ही नक्की रक्षाबंधन साजरे करु. असं धनश्री म्हणाली.

हे ही वाचा – ‘मराठी चित्रपटांचे प्रेक्षक कुठे आहेत? ते तर दाक्षिणात्य चित्रपट पाहतात’, महेश मांजरेकरांचं वक्तव्य

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -