घरताज्या घडामोडी'व्हॅलेंटाईन डे'ला खास शिव-वीणाचं रोमँटिक गाणं रिलीज होणार

‘व्हॅलेंटाईन डे’ला खास शिव-वीणाचं रोमँटिक गाणं रिलीज होणार

Subscribe

मराठी बिग बॉस दुसऱ्या पर्वातील सर्वात लोकप्रिय जोडी म्हणजे शिव आणि वीणा. या दोघांच्या मैत्रीची चांगलीच चर्चा रंगली होती. बिग बॉसच्या घरात असताना काही दिवसांनंतर शिव आणि वीणाच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्या दोघांची बिग बॉसच्या घरातील केमिस्ट्री लोकांना फारच आवडली. बिग बॉसचे दुसरे पर्व संपले असले तरी हे दोघे आपल्याला कायम एकत्र दिसतात. अजून हे दोघे रोमियो-ज्यूलीएट सारखे सगळीकडे फिरताना दिसतात. सोशल मीडियावर या दोघांचे फोटो आणि टिक-टॉक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. आता लवकरच शिव आणि वीणा एका गाण्यात रोमँटिक अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी शिवने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत ‘लवकरच’ असं लिहिलं होत. त्यानंतर या फोटोत शिव आणि वीणा असल्याचं समोर आलं आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने हे दोघांचं खास चाहत्यांसाठी रोमँटिक गाणं प्रदर्शित होणार आहे. हे गाणं सागरिका म्युझिकने केलं असून ‘कसा चंद्र’ असं या गाण्याचे बोल आहेत.

- Advertisement -

हे गाणं अवधुत गुप्तेने संगीतबद्ध केलं आहे. तर स्वप्निल बांदोडकरने हे गाणं गायलं असून संदीप खरेने हे गाणं लिहिलं आहे. येत्या १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने पुन्हा एकदा शिव आणी वीणाचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे.


हेही वाचा – अनुष्काला अभिनयाव्यतिरिक्त काहीतरी नवं करण्याची इच्छा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -