घरताज्या घडामोडी'या' देशात एकही कोरोनाबाधित नाहीये, मला तीथे जाऊन रहायचंय- केदार शिंदे

‘या’ देशात एकही कोरोनाबाधित नाहीये, मला तीथे जाऊन रहायचंय- केदार शिंदे

Subscribe

भारतातील दिवसागणिक कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या कोरोनाच्या परिस्थितीवरून प्रसिध्द दिग्दर्शक केदार शिंदे यानं केंद्र सरकारवर तिरकस टीका केली आहे. मला न्यूझीलंडला जाऊन रहायचं आहे. अशा आशयाचं ट्विट करत केदार शिंदे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

काय आहे ट्विट

मला #NewZealand इथे जाऊन रहायचयं. कसं शक्य माहीती नाही. या १०० दिवसात तिथे एकही #Corona बाधित रूग्ण नाही. महिला पंतप्रधान आहे. देवी तिथे जागृत आहे. आम्ही इथे फक्त #बेटीपढावबेटीजगाव चे फतवेच काढणार!!! असे ट्विट केदार शिंदे यांनी केलं आहे.

- Advertisement -

काय आहे न्यूझीलंडमध्ये परिस्थिती

जगातील अनेक देशांनी कोरोनावर नियंत्रण मिळवलं आहे. त्यातील एक देश म्हणजे न्यूझीलंड. जेसिंडा अॅर्डन या महिला पंतप्रधानांच्या नेतृत्त्वाखाली न्यूझीलंडने कोरोनाला हरवलं आहे. १ मे रोजी न्यूझीलंडमध्ये लॉकडाऊन शिथील करण्यात आला होता. तेव्हापासून मागच्या १०० दिवसांत एकही नवा रुग्ण आढळलेला नाही.

- Advertisement -

केदारच्या या ट्वीटनंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. त्यांना ट्रोल केलं जात आहे. मात्र, या टीकाकारांनाही त्यांनी सणसणीत उत्तर दिलंय.

काही लोकांच्या मेंदूचा chemical लोच्या झालाय. Sarcasm, तिरकसपणा या विषयी काहीच माहीती नसावी.एखादी पोस्ट टाकली की उत्तरादाखल हे बुध्दीचं प्रदर्शन मांडणार. एक मोबाईल, आईबापाने भरलेला free data, भक्तीची डोळ्यावर पट्टी बांधून यांची मोबाईलवर बोटं फिरतात! #कृष्ण जन्मून मर्दन करावं आता!


हे ही वाचा – सेटवर होणार ज्येष्ठ कलाकारांची एन्ट्री, पण नियम मात्र होणार कडक!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -