घरमनोरंजन'कॉलेज डायरी'चा संगीत अनावरण सोहळा संपन्न

‘कॉलेज डायरी’चा संगीत अनावरण सोहळा संपन्न

Subscribe

'कॉलेज डायरी' या मराठी चित्रपटाचे संगीत अनावरण प्रसिद्ध गायक बेन्नी दयाल यांच्या हस्ते करण्यात आला. पाच भाषा आणि त्या-त्या भाषांमधील सुप्रसिद्ध गायकांच्या सुरेल स्वरांनी सजलेली 'कॉलेज डायरी' मधील ही गाणी म्हणजे रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

तरुणाईच्या सगळ्यात जवळचा विषय म्हणजे ‘कॉलेज’. कॉलेजमध्ये असताना प्रत्येक तरूणाई आव्हानाला सामोरं जायला कधीच घाबरत नाही. कॉलेजच्या काळातील हे सगळे अनुभव म्हणजेच कॉलेज डायरी. प्रत्येकजण आयुष्यात अनेकदा कॉलेजच्या आठवणीत रममाण होत असतो. अशीच एक कॉलेजची कथा सांगणारा ‘कॉलेज डायरी’ १६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भावेश काशियानी फिल्म्स,आयड्रिम्झ फिल्मक्राफ्ट प्रस्तुत आणि अनिकेत जगन्नाथ घाडगे दिग्दर्शित ‘कॉलेज डायरी’ या मराठी चित्रपटाचे संगीत अनावरण प्रसिद्ध गायक बेन्नी दयाल यांच्या हस्ते करण्यात आला. पाच भाषा आणि त्या-त्या भाषांमधील सुप्रसिद्ध गायकांच्या सुरेल स्वरांनी सजलेली ‘कॉलेज डायरी’ मधील ही गाणी म्हणजे रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

हेही वाचा – वरुण – श्रद्धा ‘एबीसीडी २’ नंतर पुन्हा एकत्र

- Advertisement -

‘या’ दिग्गजांनी गायले आहेत गाणी

अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रंगलेला हा कर्णमधुर सोहळा अधिक खुलून आला तो बेन्नी दयाल यांच्या गाण्यामुळे. ‘बत्तमीज दिल’, ‘बँग बॅंग’, ‘पप्पू कान्ट डान्स’, ‘डिस्को डिस्को’ यांसारख्या पार्टी सॉंग्सवर साऱ्यांना नाचवणारे बेन्नी दयाल तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. ‘कॉलेज डायरी’ मध्ये ‘कोरंगु पट्टू’ या तामिळ गीताला त्यांनी स्वरसाज चढवला असून अश्विन यांचे शब्द आहेत तर या गाण्याला रेवा यांचे संगीत लाभले आहे. मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्लिश आणि तामिळ अशा पाच भाषांमध्ये गायलेल्या या गाण्यांच्या निमित्ताने मराठीत पहिल्यांदाच एक यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या गाण्यांच्या निमित्ताने मराठीत सुप्रसिद्ध गायकांची मैफलच जमली आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. शान, बेन्नी दयाल, शाल्मली खोलगडे,आनंदी जोशी आणि निरंजन पेडगावकर यांनी ही गाणी गायलेली आहेत. ‘पलके’, ‘Rise and Fall’, ‘हे मन माझे’, ‘लहरे’, ‘सर्वशक्तिमानम’ ही इतर गाणी असून ती गणेश-सुरेश आणि गणेश साबळे लिहिली आहेत तर डॅनिएल स्मिथ-सुहित, निरंजन पेडगावकर आणि रेवा यांनी ती संगीतबद्ध केली आहेत.

हेही वाचा –  रणवीर-आलियाचा रोमँटिक अंदाज व्हायरल

- Advertisement -

‘हे’ कलाकार आहेत मुख्य भूमिकेत

‘कॉलेज डायरी’ची कथा अनिकेत जगन्नाथ घाडगे यांनी लिहिली असून संवाद अनिकेत जगन्नाथ घाडगे आणि विशाल सांगले यांचे आहेत. या चित्रपटात विशाल सांगळे, आनंद बुरड, समीर सकपाळ, वैष्णवी शिंदे, शरद जाधव, प्रतीक्षा शिवणकर, शिवराज चव्हाण, अविनाश खेडेकर, प्रतीक गंधे, शुभम राऊत, हेमलता रघू, जनार्दन कदम, आदींच्या भूमिका आपल्याला पाहता येतील. सध्या ‘कॉलेज डायरी’ मधील गाणी विविध सोशल पोर्ट्लसवर उपलब्ध असून तुम्ही त्यांचाआनंद घेऊ शकता. १६ फेब्रुवारीला ‘कॉलेज डायरी’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून त्याआधी चित्रपटामधील विविध भाषांतील ही पाच गाणी प्रेक्षकांची मनं जिंकतील यात काही शंका नाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -